पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा रायगडावर सत्कार…द. भ. प. साईनाथ महाराज
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी
माहुर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत केशवराव कपाटे यांना कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानचा पुरस्कार प्राप्त झाल्याने तसेच राज सुमेरसिंग ठाकुर यांना अब्दुल कलाम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने व विजय दत्तात्रेय आमले यांनी लोकपत्र दैनिकाच्या प्रबंधनाने गौरविल्याने या सर्व पत्रकारांचा रायगड किल्ल्यावर सत्कार करण्यात येईल असा मनोदय वसमतकर मिठाचे मठाधिपती द.भ.प.साईनाथ महाराज यांनी व्यक्त केला.स्थानिक भक्त मंडळाच्या धर्मशाळेत दि.११ फेब्रु.रोजी सायं. विजय आमले यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी लोकपत्र या दैनिकाच्या प्रबांधनाने उत्कृष्ट पत्रकार म्हणून विजय आमले यांचा केलेला सत्कार,तसेच त्यांची दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी हे होते,तर मठाधिपती साईनाथ महाराज,शिवसेना नेते ज्योतिबा खराटे,ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान,नंदकुमार जोशी व डॉ.प्रसन्न पांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी रहेमत अली,जयकुमार अडकिने,ज्योतिबा खराटे,नंदू संतान, नंदकुमार जोशी, डॉ. प्रसन्न पांडे,सरफराज दोसाणी,वसंत कपाटे,पूजनीय साईनाथ महाराज व नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आपल्या मनोगतातून विजय आमले यांचेवर स्तुती सुमने उधळली.याप्रसंगी भाऊ पाटील,कृष्णा बेलखोडे, दिलीप पांडे,अनिल कोरटकर, निरधारी जाधव, प्रा.भाग्यवान भवरे,केशव भगत,प्रकाश मुनेश्र्वर,गजानन रिट्ठे,विजय कांबळे,पत्रकार सुरेश गिऱ्हे,अनिल मडपलीवार,संजय बनसोडे,सुरेखा तळणकर,गोपाल खापर्डे आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचलन एस. एस.पाटील यांनी केले, तर प्रस्ताविक व आभार नंदू संतान यांनी मानले.