वाई बाजार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन..!
"बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत महामानवास मानवंदना..!!
![](https://bkmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/12/IMG_20241206_39732.jpg)
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महारिनिर्वाण दिनानिमित्त वाई बाजार येथे बहुसंख्य धम्मबांधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.
आज दि. ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाई बाजारचे सरपंच सिताराम दामा मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून चौकातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन जेष्ठ धम्मउपासक आयु. बंडू तायडे व प्रल्हाद खडसे यांच्या हस्ते संयुक्तरीत्या करण्यात आले..
“बौद्ध विहार परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन मान्यवरांसह येतील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. झनक मानकर यांच्यासह जेष्ठ धम्मउपासक मुकुंद पारधे व पंजाब खडसे यांच्यासह उपस्थित बांधवांनी करून परिसरातील पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन धम्मभगिनी प्रभाताई कांबळे तसेच संध्याताई मुकुंद पारधे यांनी केले.. तद्नंतर येथील पंचशील बौध्द विहारात तथागतांना वंदन करून येथील पाटील ताई यांनी उपस्थितांना त्रिसरण, पंचशिलासह संपुर्ण धम्मविधीचे ग्रहण दिले…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनाथपिंडिक कंधारे यांनी केले.. या मानवंदनेच्या कार्यक्रमास गावातील समस्त बौद्ध बांधव, रमाई महिला मंडळाच्या धम्मभगिनी तसेच परिवर्तनवादी विचारमंचच्या सर्व कार्यकर्त्यांसह गावातील प्रतिष्ठितांची उपस्थथिती होती…
![](https://bkmaharashtranews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220803_47373.jpg)
![](https://bkmaharashtranews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221024_45618.jpg)