नोकरी संदर्भईतर

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली माहूर पोलीस ठाण्याची तपासणी….

"पोलीस पाटील तसेच महिला दक्षता समितीसह मान्यवरांना केले संबोधित..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर

 माहूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माहूर पोलीस ठाण्याला भेट देऊन येथे पोलीस पाटील महिला दक्षता समितीसह नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेत शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले..

 

आज दि. 29 रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी वार्षिक तपासणी निमित्त माहूर पोलीस ठाण्याला भेट दिली. येथे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सलामी देऊन सन्मान केला. यावेळी पोलीस विभागाअंतर्गतच्या सर्व तपासणी अंती माहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावल्याने त्यांचे अभिनंदन केले.  तसेच यावेळी आलेल्या पोलीस पाटील व महिला दक्षता समितीच्या मान्यवरांना त्यांनी संबोधित करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले..

 

 

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराय थरणे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, परीक्षा विधीन अधिकारी किरण पोपळघट, सपोनी शिवप्रकाश मुळे, सपोनी रमेश जाधवर, सपोनी शेख गफार, पो.उपनिरिक्षक पालसिंग ब्राह्मण, पो.उप नि.आनेबोईनवाढ आदी उपस्थित होते.  यावेळी पेंटर सुरेश आराध्ये यांनी रांगोळी द्वारे शहाजी उमाप यांचे रांगोळीतून छायाचित्र काढल्याने त्यांची स्तुती केली.. यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी सर्व तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close