माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा….
"आ. केराम यांच्या प्रयत्नांना यश..! आमदार महोदयांवर अभिनंदनाचा वर्षाव..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर येथील माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी आ. केराम यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद येऊन अखेर शॉपींग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे अनेक बेरोजगारांना स्वयंजगाराची संधी प्राप्त होणार असल्याने तालुक्यातील जनतेतून आ. केराम यांचे आभार व्यक्त होत आहेत…
माहूर तालुक्यातील बेरोजगारांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध ह्वावा या उदात्त हेतूने माहूरच्या बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे यासाठी पत्रकार इलियास बावाणी यांनी मागील काळात आमदार भिमरावजी केराम यांचे सह सर्व मान्यवराकडे पत्रव्यवहार केला होता.. याची दखल घेऊन आ. केराम यांनी राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. याची दखल घेऊन एसटी महामंडळ विभागाचे वास्तु शास्त्रज्ञ यांनी नांदेडच्या विभाग नियंत्रक सि. एन. वडचकर यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी बाबत तात्काळ विहित नमुन्यात माहिती सादर करण्याचे आदेशित केल्याची माहीती सुत्रांकडून प्राप्त झाली असून यामुळे माहूर बसस्थानक परिसरातील रिकाम्या जागेत शॉपींग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची अधिकृत माहीती समोर आली आहे…
“किनवट माहूरचे लोकप्रिय आमदार भिमरावजी केराम यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून व परिणामकारक पत्रव्यवहार करून शॉपींग कॉम्पलेक्स उभारण्याबाबतच्या नागरीकांच्या मागणीला प्रत्यक्षात उतरवण्याचे मौलीक कार्य केले असून यासाठी भाजपाचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अनिल वाघमारे यांनीदेखील पाठपुरावा केला आहे… त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीचा भूमिपूजन सोहळा लवकर पार पडेल अशी सदिच्छा अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत असून आ. केराम यांच्या जलद कार्यप्रणालीवर तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

