नोकरी संदर्भसामाजिक

शासनाच्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना अखेर वाळू वाटपास माहूर तालुक्यातून सुरुवात….

"माहूर तालुक्यातील पडसा येथून तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर

 शासनाने ठरविल्याप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून वाळू अभावी बांधकाम रखडलेल्या घरकूल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचे शासन धोरण प्रत्यक्षात अवतरले असून आज दि. २४ रोजी या उपक्रमाची सुरूवात माहूर तालुक्यातील पडसा येथून सुरू करताना तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला..

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाखोच्या संख्येने मंजूर केलेले केलेल्या घरकुल योजनेच्या बांधकामासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा शासनाच्या स्वप्नपूर्ती संकल्पचा शुभारंभ आज दि. २४ मे रोजी आमदार भिमरावजी केराम यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरचे तहसीलदार किशोर यादव  यांनी माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील घरकुल लाभार्थ्यांना मौजे पडसा, वडसा व टाकळी येथून मोफत वाळू वाटपाच्या योजनेचा शुभारंभ केला…

   यावेळी शासनाच्या या उपक्रमाबद्दल माहूर तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यातून अभिनंदनची लाट उसळली असून लाभार्थ्यांना घरपोच व केवळ वाहतुकीसाठी लागणा-या माफक खर्चात प्रती लाभार्थी पाच ब्रास वाळू मिऴणार असल्याने शासनाच्या या वाळू धोरणाचे जनतेतून स्वागत केले जात आहे… तर तालुक्यातील संपुर्ण घरकुल लाभार्थ्यांना येत्या सोमवार पासून वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे तहसिलदार किशोर यादव यांनी यावेळी सांगितले आहे…

 

“मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि 8 एप्रिल व 30 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध होईल तिथून पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे जाहीर केले होते.. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी उपलब्धतेची चाचणी करण्यात येत होती.. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सर्व मंडळ अधिकारी तलाठ्यांना सोबत घेऊन वाळू स्त्रोतांची पाहणी करून आज दि. 24 रोजी मौजे पडसा येथून मोफत वाळू वाटप योजनेचा शुभारंभ केला… यावेळी आमदार भीमराव केराम यांनी लाभार्थ्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या….

 

 

यावेळी तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, सरपंच रुखमाबाई आरके, भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के, भाजपाचे अनिल वाघमारे, नगरसेवक गोपू महामुने, उपसरपंच बाबाराव चौधरी, विलास पाटील चौधरी, प्रकाश गायकवाड, किसनराव मारबते, नंदकुमार जोशी, विजय आमले, हर्षदीप दीक्षित, कुलदीप घोडेकर, आनंदा हिंगाडे, निलेश तायडे, अविनाश भोयर, विनायक मुसळे, शेख इमरान, जितू चोले, शेख मोईज, लाभार्थी बंडू शेवाळे, शेंडे, शुभम भवरे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते… 

यावेळी तहसीलदार किशोर यादव यांचा वडसा, पडसा व टाकळी या तिन्ही गावातील नागरिकाकडून जाहीर सत्कार करण्यात आला….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close