मालवाडा येथील हनुमान मंदिरासह खंडाखोरी कडे जाणारा रस्ता बनला मृत्यूचा सापळा….
हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्न करणार -प्रशांत राठोड

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
माहूरच्या पायथ्याशी मालवाडा येथील पवित्र नवसाला पावणाऱ्या श्री हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनल्याचे विदारक चित्र असून आज दि. ३१ रोजी येथे दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या सेवा संकल्प प्रतिष्ठानचे प्रशांत राठोड यांंनी रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था पाहून तातडीने शासन दरबारी पाठपुरावा करून स्ता निर्मीतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले…
माहूर तालुक्यातील मौजे मालवाडा येथील हनुमान मंदिराकडे लिंबायत फाट्याच्या नजीक राष्ट्रीय महामार्गापासून जाणारा मार्ग आहे.. हाच मार्ग पुढे गिट्टी क्रेशर व पौराणिक खंड्याखोरी तलावाकडे जातो.. परंतू या रस्त्यात आजमितीस चिखलाचे साम्राज्य झाले असून अनेक वर्षापासून मागणी होऊनहीं सदरचा रस्ता झालाच नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे… दरम्यान आज दि. ३१ मे रोजी सेवा संकल्प प्रतिष्ठाणचे प्रशांत राठोड हे पवित्र हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी गेले असता रस्त्याची वाईट अवस्था पाहून अवाक् झाले.. तर याच रस्त्यावरून जाताना समोर ट्रॅक्टरही फसलेले दिसत असल्याने त्यांनी मालवाडा गावातून पायी जाताना हनुमान मंदिर गाठले व दर्शन घेतले.. यावेळी रस्त्याची अवस्था पाहून या रस्त्यासाठी प्रथम प्रधान्याने शासन दरबारी पाठपुरावा करू असे वचन यावेळी उपस्थिताना दिले….
यावेळी हरिश्चंद्र कुलकर्णी, पाटील महाराज, कार्तिक भारती महाराज, वसंत कपाटे, विजय आमले, इलियास बावाणी, ऋषीराज वाघमारे, शुभम मार्गमवार, अक्षय मार्गमवार, पवन मार्गमवार, राजाराम गंदेवाड, विजय कांबळे, गौरव मार्गमवार, विनोद पाटील सूर्यवंशी, जयकुमार अडकिने, संजय बनसोडे, योगीराज वाघमारे, केशव जाधव, बिरज वर्मा, अवधूत पराते, ओम पराते, दयाळू जाधव, प्रमोद मार्गमवार, विलास मार्गमवार, सचिन ढेरे, राज ठाकूर, पवन शर्मा, गजानन शिंदे, सोनू चौधरी पाटील, गजानन चव्हाण, राजू चव्हाण, विजय कांबळे, बळीराम गवळी, प्रमोद सोनकर, गौरव मार्गमवार, वानखेडे, बालाजी गेंटलवार, नवल वानखेडे, देविदास वानखेडे, केशव पाटील, आदेश शिंदे, गुड्डू शिंदे, बंडू राठोड, दिनेश पवार, प्रदीप पवार, राजू राठोड, दीपक चव्हाण, अविनाश राठोड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते…
“विशेष म्हणजे सनदी अधिकारी असलेले प्रशांत राठोड यांच्याकडून प्रत्येक गाव खेड्यात जसे की, लग्न समारंभ, मयतांच्या घरी घरी चहा पानाच्या कार्यक्रम तसेच इतरही अनेक सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावत असतात.. गोरगरिबांच्या सुख दुःखातही ते भेटी देऊन सांत्वन करत दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करत असतात.. दिनदुबळ्यांचा सहारा तसेच आदिवासी, मुस्लिम, दलित, बंजारा समाजासाठी प्रत्येक कामात हातभार लावत असल्याने त्यांची सर्व समाजाचा आधारवड म्हणून किनवट माहूर तालुक्यात जनता त्यांच्याकडे पाहत आहे….

