माहूर तालुक्यातील ‘चोले पेंड’ येथून मोफत वाळू वाटपाला सुरुवात….
पडसा पेंडावर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने शेवटी चोले पेंडवरून मोफत वाळू वाटपाला सुरुवात

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार दि. 20 मे रोजी पासून घरकुलधारकांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ करायचे होते. सदरील प्रक्रिया ऑनलाईनच्या प्रक्रियेत अडकल्याने दि. 5 रोजी येथून तहसीलदार मुंगाची काकडे यांनी लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ केला. परंतु ऑनलाइनची प्रक्रिया किचकट असल्याने ओटीपी जनरेट होत नसल्याच्या तक्रारी होत असल्याने तहसीलदारांनी तात्काळ ऑफलाईन पावत्या देऊन घरकुलधारकांना वाळू द्यावी अशी मागणी होत आहे…
शासनाच्या आदेशानुसार दिनांक 20 मे पासून घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे आदेशित केले होते. परंतु ऑनलाईन प्रक्रियेच्या चक्रव्यूहात मोफत वाळू प्रक्रिया अडकल्याने मौजे पडसा येथे वाळू वाटप चालू करण्यात आला होता. परंतु मुबलक वाळू उपलब्ध असताना तसेच व्यवसायिकांना रस्ता बनविण्याची परवानगी देऊन आज वाटप सुरू करायचे होते. परंतु रस्ता बनविणाऱ्या तसेच वाळू जमा करणाऱ्या वाहनांना सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पकडल्याने आज दि. 5 पासून तालुक्यातील चोले पेंड येथून वाळू वाटपास तहसीलदार मुंगाची काकडे यांनी सुरुवात केली…
यावेळी मंडळ अधिकारी साळसुंदर, तलाठी सी.पी. बाबर, प्रभू पानोडे, यांचे सह कर्मचारी उपस्थित होते…
“शासनाच्या आदेशानुसार दिनांक 20 मे ते 9 जून पर्यंत वाळू वाटप करायचे उद्दिष्ट होते. परंतु फक्त चारच दिवस उरलेले असताना जवळपास आठ हजार घरकुल धारकांना या ठिकाणाहून पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा होईल का.? हा प्रश्न असून वाहनांची संख्या कमी असल्याने तसेच ओटीपी जनरेट होत नसल्याने तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी तात्काळ ऑफलाइनच्या पावत्या देऊन वाळू वाटप करावी अशी मागणी घरकुल लाभार्थ्यातून होत आहे…..

