पुलाच्या दुरूस्तीसाठी मेट वासीयांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको….
'तब्बल एक तास महामार्गावरील वाहतुक रोखली ; मेट येथील महिलांंसह विद्यार्थीही रस्त्यावर..!'

किनवट/माहूर
यंदाच्या पावसात झालेल्या अतिवष्टीमुळे उखडलेल्या पुलाची तातडीने दुरूस्ती करून दण्याच्या मागणीसाठी माहूर तालुक्यातील मेट येथील महिलांसह विद्यार्थी व नागरीकांनी राष्ट्रीय महामर्गावर तब्बल दोन तास रास्तारोको करत प्रशासनास वेठीस धरून आपला रोष व्यक्त करत तातडीने पुल दुरूस्त करण्याची मागणी केली…
माहूर तालुक्यातील मौजे मेट या गावाला राष्ट्रीय महामार्गाला जोडणा-या व दळणवळणाचा मुख्य मार्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेला पुल चालू वर्षातील अतीवृष्टीने अक्षरश: वाहून जाऊन नळकांडी पुलाला मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे मेटवासीयांना दळणवळणासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी अनेक निवेदने देवूनदेखील पुल दुरूस्तीसाठी प्रशासनाला जाग येत नाही हे पाहू आज दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गावरील उमरा व मेट फाट्यावर मेट वासीयांनी महिला व विद्यार्थांसह प्रचंड आक्रोष व्यक्त करीत रास्ता रोको सुरू केला होता. त्यावेळी संबंधित विभागाच्या जबाबदार अधिका-यांमार्फत ठोस लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे प्रशासनास काही काळ तणावात रहावे लागले होते…..
दरम्यान आज झालेल्या रास्ता रोको ला नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह अनेेक नेत्यांनी भेट देवून आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच सांत्वनपर आश्वासनदेखील दिले… आंदोलन शेवटी संबंधित विभागाच्या आश्वासनानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास मागे घेण्यात आल्याचे समजते.. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माहूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शरद घोडके यांच्यासह सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि. रमेश जाधवर व दोन्ही पोलीस ठाण्याचे कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून होते…..






