वाई बाजार जि.प.गटाचे शिवसेना (शिंदे) संभाव्य उमेदवार पिंटू पाटील वायफनीकर यांच्या भेटीगाठी..
"प्रभावी कौशल्याचा उमेदवार म्हणून दौऱ्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. !"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(सुरज खोडके)
माहूर, प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून माहूर तालुक्यातील वाई बाजार जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली अससताना जनतेत राहून विविध आंदोलनांसह सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत नेहेमी तत्पर असलेले पिंटू पाटील वायफनीकर यांनी वाई बा. जि. प. गटात जनसंपर्क दौ-याला सुरूवात केली आहे. यात नवा व प्रभावशाली संभाव्य उमेदवार म्हणून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे….
माहूर व किनवट या दोन्ही तालुक्यातील सुपरिचित असलेले पिंटू पाटील वायफनीकर हे मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या संपर्कात असून जनता जनार्दनासह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहेत. विविध आंदोलनांसोबतच अगदी गावपातळीवरील विजेच्या प्रश्नांना तत्परतेने प्रश्न मार्गी लावण्याचे काम करताना जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यात सक्षम आणि कर्तव्यतत्पर असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे… त्यामुळे वर्षानुवर्षांपासून जनतेच्या नजरेत कंटाळवाने ठरलेल्या जुन्या चेह-यांना जनता तोंडावर गोड बोलत असली तरी यावेळी जनता मात्र नव्या व प्रभावशाली चेह-यालाच पसंती देणार असल्याचे उघड सत्य आहे…व तसे जनतेतून उघडपणे बोलले जात आहे…त्यामुळे पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीने वाई बाजार जि. प. गटात वेगळे चित्र पहावयास मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत…
विशेष म्हणजे पाटील हे मागील अनेक वर्षांपासून किनवट आणि माहूर तालुक्यात विविध आंदोलने, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, रस्ते दुरुस्ती साठी चक्क पडत्या पावसात रस्त्यावरील खड्ड्यात बसून केलेली आंदोलने, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांना रोहित्र मिळवून देण्यासाठी असो की शाळकरी मुला-मुलींना बसची सुविधा असो सदैव तत्पर राहून सर्व सामान्यांची कामे मार्गी लावण्यासह सामाजिक कार्यातही तेवढ्याच पोटतिडकिने अग्रेसर असल्याचे जनता जानून आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाई बाजार जि.प. गटातून शिवसेना शिंदे गटाकडून युवानेते पिंटू पाटील वायफनीकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यांनी वाई बाजार जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविण्याची पूर्ण ताकदीने तयारी केली असून कार्यकर्त्यांसह वाई बाजार परिसरातील जनतेचा भेटीगाठी दौरा त्यांनी सुरू केला आहे.


“उपेक्षित व वंचितांच्या अडचणी जाणून घेत तत्काळ सोडविण्याचेही मोलाचे कार्य त्यांच्याकडून होत असल्यामुळे वाई बाजार परिसरातील जनतेतून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पिंटू पाटील यांचा आजपर्यंतचा राजकीय आणि सामजिक संघर्षमय प्रवास पाहता सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तत्काळ निवारण करणारे युवा नेतृत्व म्हणून किनवट-माहुर तालुक्यात त्यांची ओळख पटलेली आहे. त्यामुळे केवळ जनतेच्या सेवेची संधी मिळावी यासाठीच मी वाई बाजार जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याचा मानस केला असल्याचेही पिंटू पाटील यांनी आमच्याशी बोलताना म्हटले आहे….


