महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुरेखा तळनकर यांची नियुक्ती….
'नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्यासह कार्यकारीणीस नियुक्तीपत्र देवून सत्कार..!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माहूर तालुकाध्यक्षपदी सुरेश शिंदे तर महिला तालुकाध्यक्षपदी धडाडीच्या महिला कार्यकर्त्या तथा महिला पत्रकार सुरेखा तळनकर यांच्या नियुक्तीबरोबरच नवनिर्वाचित तालुका कार्यकारीणीची निवड झाल्याने समस्त नाभिक समाजाबरोबरच मित्र परिवाराकडून नवनिर्वाचित कार्यकारीणीचे अभिनंदन करण्यात येत आहे…
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष दत्तात्र्यय चाफळकर यांच्या हस्ते
नियुक्तीपत्र देऊन माहूर तालुका नाभिक महामंडळाच्या तालुका शाखा माहूरच्या नवनिर्वाचित तालुका कार्यकारीणीचा नियुक्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला… यात माहूर तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे तर महिला तालुकाध्यक्षा म्हणून धडाडीच्या महिला कार्यकर्त्या तथा महिला पत्रकार सुरेखा बालाजी तळणकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबरोबरच उपाध्यक्षपदी बबन पोलासवार तर सचिवपदी गंगन्ना पोलस्वार यांची नियुक्ती करण्यात आली..
दरम्यान महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या माहूर तालुका कार्यकारीणीत फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे राहूल राऊत यांच्या खास सहकार्यातून व आयोजनातून पार पडलेल्या तसेच राजाराम पसपुलवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठरीत जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चापलकर, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू गायकवाड, किनवट चे कार्यकर्ते लक्ष्मणराव लिंगमपल्ले, किनवट शहर अध्यक्ष अमोल हळदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यात महिला तालुका अध्यक्ष पदि सुरेखाताई बालाजी तळनकर व पुरुष तालुका अध्यक्ष सुरेश गोविंद शिन्दे, ता. उपाध्यक्ष बबन नागोराव पोलसवार, ता. सचिव गंगना तुकाराम पोलसवार, ता. कार्याध्यक्ष विलास नानाजी राऊत, ता. सहसचिव बालाजी तळणकर ता. सल्लागार जगदीश वडसकर यांची निवड करण्यात आली. तर याप्रसंगी माहुर तालुक्यातील नाभिक समाज बाधंव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…
यावेळी जेष्ठ नागरिक राजारामजी पस्पुलवार यांच्यासह बाबाराव चिल्लेकर, जगदीश वडसकर, योगेश खुळखुळे, कैलास राऊत, प्रदीप शेरकुरवार, अरविंद दवणे, लक्ष्मण नरपडवार, विष्णू गुडलवार, किशोर शिरपूरकर, बालाजी तळणकर, नितीन वडस्कर, विनोद लिंगरवार तसेच इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संपुर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व समाधानकारक वातावरणात पार पडला…





