नोकरी संदर्भक्राइम

किनवट येथील दोन लाचखोर महिला तलाठी 16 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात….

"वडिलोपार्जीत शेती नावावर करण्यासाठी केली होती लाचेची मागणी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   वडीलोपार्जीत शेतजमीनीपैकी अर्धी जमीन कुटुंबातील एकाच्या नावावर करण्यासाठी सतरा हजाराच्या लाचेेेची मागणी करून तडजोडीअंती स्विकारणा-या किनवट तालुक्यातील दोन महिला तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्या असून यामुळे किनवट व माहुर तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे…

   किनवट तालुक्यातील तलाठी सज्जा निचपूर येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठी भाग्यश्री भिमराव तेलंग वय ३४ वर्षे तसेच सज्जा कणकवाडी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठी सुजाता शंकर गवळे वय २५ वर्षे या दोन महिला तलाठ्यांना आज दि. ३ जुन रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोळा हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाने जारी केलेल्या माहीतीत म्हटले आहे….

दरम्यान याप्रकरणी ४७ वर्षीय एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार यातील आरोपी लोकसेवक भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, जिल्हा नांदेड तसेच सुजाता शंकर गवळे वय 25 वर्षे,  पद तलाठी, सज्जा कणकवाडी, ता. किनवट, जिल्हा नांदेड यांनी यातील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित 7 एकर शेतजमीनीपैकी अर्धी शेती म्हणजेच साडे तीन एकर शेती तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता.. त्यासाठी तलाठी तेलंगे यांनी प्रथम चाळीस हजार रुपये व तडजोडी अंती 17000/_ रूपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने दि. 29/05/2025 रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती…

दरम्यान आज दि. ३ जुून रोजी पंचासमक्ष लाचमागणीची पडताळणी केली असता, यातील तक्रारदार लोकसेविका तलाठी तेलंगे व तलाठी गवळी यांना भेटले. त्यावेळी तलाठी तेलंगे यांनी तक्रारदार यांना तलाठी गवले यांना भेटा असे सांगून त्यांच्या कडे पाठविले. तेव्हा तलाठी गवले यांनी तक्रारदार यांची फाईल घेऊन तलाठी तेलंगे यांना दाखवून त्यांना बोलून परत आले व तेलंगे मॅडम ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे करा असे म्हणाल्या… त्यानंतर  तक्रारदार यांनी तलाठी तेलंगे यांना कामाचे विचारले असता, तेव्हा तलाठी तेलंगे म्हणाले की त्यादिवशी सांगितले, त्यापेक्षा 3 हजार कमी केले. त्यावेळी तक्रारदार त्यादिवशी सतरा हजार म्हणले होते असे बोलले, तेव्हा तलाठी तेलंगे यांनी तलाठी गवले यांची समक्ष अठरा हजार रुपये असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी आता अठरा हजार आणू की सोळा हजार असे म्हणाले. तेव्हा तलाठी तेलंगे यांनी सोळा हजार असे म्हणून स्वतः साठी व तलाठी गवले यांच्या साठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना मिळून आले आहेत…   तथापि, आज दि. 03/06/2025 रोजी लाच स्वीकृती सापळा कार्यवाही आजमावली असता, तक्रारदार यांच्या कडून लोकसेविका तलाठी तेलंगे आणि गवळी यांनी लाचेची रक्कम 16000/_ रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत…
सदर प्रकरणी आरोपीचे अंग झडतीमध्ये एक Vivo कंपनी चा आणि एक relame कंपनी चा मोबाईल. तसेच भाग्यश्री तेलंगे यांच्या ताब्यातून नगदी 6620 रुपये आणि सुजाता गवळी यांच्या ताब्यातून नगदी 18820 रुपये मिळून आले आहेत..तर आरोपी लोकसेवक यांचे किनवट व नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू सुरू असून तलाठी तेलंगे आणि गवळी  यांचेविरुद्ध पो.स्टे. किनवट, जि. नांदेड येथे  भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे… याप्रकरणी आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे…
या यशस्वी सापळा प्रकरणात संदीप पालवे, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्यासह डॉ.संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, तसेच प्रशांत पवार पोलीस उपअधीक्षक  ला. प्र. वि. नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रिती जाधव, सहा. पोलीस उप निरीक्षक शेख रसूल, अरशद अहेमद खान, सयद खदीर व चापोह /गजानन राउत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. यांनी ही महत्वपुर्ण कामगीरी बजावली…
“विशेष म्हणजे या दोन महिला तलाठ्यांपैकी एका महीला तलाठ्याची नांदेड येथे बदली झाली असून त्या महिला तलाठ्यास काल दि. २ जून रोजीच कार्यमुक्त केले असल्याची माहीती काही मंडळींकडून सांगण्यात येत आहे… तर दुसरी महीला तलाठी ज्या सज्जावर कार्यरत आहे ते गाव त्या महिला तलाठ्याचे स्वत:चे गाव असल्याची माहीती यावेळी उपस्थित जनतेकडून ऐकावयास मिळाली… ही बाब अत्यंत वेदनादायी असून ‘जैसी करणी वैसी भरणी’ या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय देणारी असल्याची उघड चर्चा दोन्ही तालुक्यातून होत आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close