ईतर

अंजनखेड नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक.. एकाचा जागीच मृत्यू;  एक जखमी..

"सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी साडेचारची घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना आज दु. साडेचारच्या सुमारास घडली असून याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे….

 आज दि. ४ ऑक्टोबर रोजी पिंटू मानिक आत्राम वय २५ रा. अंबाडी ता. किनवट हा वाई बाजार वरून सारखणीकडे जात होता. तर त्याच समयी गोवींद गणपत शेवाळे वय ४५ हे सारखणी कडून माहूरकडे जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे..  दरम्यान दुपारी साडेचारच्या दरम्यान परस्पर विरोधी दिशेला जात असलेल्या दुचाकी क्र. एम.एच. २६ सी.एफ. ९१०७ व दुसरी दुचाकी ९९३३ यांची समोरासमोर धडक झाल्याने गोवींद गणपत शेवाळे वय ४५ रा. माहूर याचा जागीच मृत्यू झाला. तर मानिक आत्राम हा जखमी आहे..  
   “याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. १५ /२०२४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून जखमीवर वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यास घरी पाठवल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत मयताचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रीया सुरू होती.. याप्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close