क्राइम
पडसा येथील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणात प्रतिवादींकडून वादीच्या वकीलाची फाईल चोरी ; वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
"तिन महिण्यांपुर्वी केलेल्या चोरीचे बिंग फुटणार "


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
नांदेड, प्रतिनिधी
संपुर्ण माहूर तालुक्यातील पडसा गावासह परिसराच्या चर्चेचा विषय बनलेल्या ‘रस्ता बंद’ प्रकरणातील नाट्यमय घडामोडी एकापाठोपाठ एक उजागर होत असून मनुष्यबळाचा वापर करून प्रतिष्ठेची लढाई बनवलेल्या ‘त्या’ प्रकरणातल्या प्रतिवादींकडून चक्क वादीच्या वकीलाची मुळ कागदपत्राची फाईलच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे आहे. या प्रकरणात वादीच्या वकीलाने वजिराबाद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तिन महिण्यांपुर्वी केलेल्या चोरीचे बिंग फुटणार असल्याचे निश्चित आहे…
नांदेड येथील वजिराबाद पोलीस ठाण्यात येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करणारे वादीचे वकील अँड. राजेद्र माणिकराव लोणे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, मी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे सन 2010 पासून वकिली व्यवसाय करतो. माझे पक्षकार वसंता नागोराव भगत राहणार पडसा, तालुका माहूर जिल्हा नांदेड यांच्या वतीने प्रतिवादी प्रकाश नारायण गायकवाड व इतर यांच्याविरुद्ध वादी वसंता नागोराव भगत यांच्या घरासमोरील जाण्याच्या मार्गातून कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये. याबाबत आदेश मिळण्याकरिता नियमित दिवानी दावा क्र. 289/ 2024 दाखल केला आहे. सदर प्रकरणाच्या दिनांक 04/07/2025 रोजीच्या सुनावणीसाठी मी महत्त्वाची कागदपत्रे व नोटस् तयार करून माझ्या टेबलवर ठेवल्या होत्या. परंतू सुनावणीच्या ऐन वेळी सदरील नोट्स व महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी सदरील नोट्स व महत्त्वाचे कागदपत्रे अनावधानाने कुठेतरी ठेवल्याचे समजून माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मी सदर प्रकरणात युक्तिवाद केला होता…
परंतू, काल दिनांक 23/10/2025 रोजी माझे पक्षकार वसंता नागोराव भगत यांनी मला फोन करून, ‘आपण बसून तयार केलेले नोट्स व महत्त्वाची कागदपत्रे हे प्रतिवादी पडसा या गावी मोठेपणाच्या नादात दाखवत फिरत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर वादीचा वकील विकला गेला आहे आणि त्यांनी सदरचे कागदपत्रे आम्हाला दिले आहेत. असे बोलून माझी समाजात बदनामी करण्यात सुरुवात केली आहे. यावरून माझे ठाम मत झाले आहे की, सदरील फाईल ही गहाळ झाली नसून ती हेतू पुरस्सर गैरअर्जदार प्रतिवादींनी कोणाच्यातरी माध्यमातून माझ्या टेबलवरुन हेतू पुरस्सर चोरी करून नेली आहे.. अशी लेखी तक्रार अँड. लोणे यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात केली असून… टेबलवरुन महत्वाचे कागदपत्रे व नोट्स असलेली फाईल हेतू पुरस्सर चोरून नेणाऱ्या प्रकाश नारायण गायकवाड व त्यांचे यातील इतर सहकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन माझी महत्त्वाची दस्तऐवज असलेली फाईल मला परत मिळवून दण्याची मागणी केली आहे…
याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होणार असून न्यायालयातील सिसीटीव्ही फुटेजसह आवश्यक इतर माहितीस्त्रोतांना तपासून लवकरच फाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठीची कार्यवाही वजिराबाद पोलीसांनी सुरू केल्याचेही सांगण्यात आले आहे…
“विशेष म्हणजे पडसा येथील ते वादग्रस्त प्रकरण मा. न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना केवळ जमाव व महिलांना पुढे करून न्यायप्रविष्ठ प्रकरणातील घराचा रस्ता बंद करणारे वादग्रस्त बांधकाम नवीन ग्रामसेवक व विस्तार अधिका-यांना ‘उल्लू’ बनवत बोगस ग्रा.पं. आदेशाचे पत्र काढून जोरजबरदस्तीने सुरू केले आहे.. यावेळी वादीने चिडून जाऊन आपला संयम सोडावा या हेतूने प्रतिवादींकडून भडकाऊ कृती केली जात असली तरीही जोरजबरस्तीने करीत असलेले बांधकाम जास्त दिवस टिकणार नाही हा विश्वास वादी वसंता भगत यांना असल्याने वादीने संयम ठेवताना अद्यापही न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले आहे….










