

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
महाराष्ट्र शासन अंगिकृत महिला आर्थिक विकास महामंडाळच्या अधिनस्त लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने आज दि. ७ ऑक्टो. रोजी बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा किनवट येथे महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत संपन्न झाली असून ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करण्यासाठी महिलांना विविध प्रकारच्या योजनांची माहीती देण्यात आली…

आज दि. ७ ऑक्टोबर रोजी किनवट येथील साईमंदीराच्या सभागृहात पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी प्रगती लोकसंचालित साधन केंद्र च्या प्रभावती शेंडे होत्या.. तर ICICI बँकेचे बचतगट मॅनेजर अनिल इंगोले, यांच्यासह राहूल शिंदे व्यवस्थापक सावित्री CMRC नांदेड, श्रीमती रमा दामोदर, व्यवस्थापक अर्धापूर, श्रीमती सुकेशना कपाटे, श्रीमती कमलाताई देशमुख, लेखापाल सिद्धीकी अझहर यांच्यासह अनेकांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती.

तत्पुर्वी महिलांच्या उद्धारकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली… दरम्यान निरंतर विकास प्रक्रियेतून महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी महिलांची सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या या शासनाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रगती लोकसंचालित साधन केंद्र किनवट चे व्यवस्थापक विशाल श्रोते यांनी उपस्थित महिला समुदायाला अत्यंत उपयुक्त माहीती देताना मागील वर्षात राबविलेल्या उपक्रमांसोबतच चालू वर्षात प्रगतीपथावर असलेले उपक्रम तसेच आगामी वर्षात राबविणा-या योजनांची माहीती दिली… तर प्रमुख पाहूणे उपस्थित असलेले राहूल शिंदे यांच्यासह अनिल इंगोले, श्रीमती रमा दामोदर तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षा प्रभावती शेंडे यांनीही उपस्थितांना सखोल व उपयुुुुक्त मार्गदर्शन केले…

किनवटसह हिमायतनगर व माहूर या तीन तालुक्यातील बचतगट महिलाच्या या सभेदरम्यान बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ कार्य केलेले हिमायतनगर तालुक्यातील ४ प्रेरकांसह ७० बचतगट, इस्लापूर विभागातील ५ प्रेरक व ८० बचतगट, किनवटमधील २ प्रेरक व ७० बचतगट तसेच माहूर तालुक्यातील २ प्रेरक व ८५ बचतगटांचा सन्मान करताना यावेळी प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले… तर बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय कार्य बजावणा-या जिल्ह्यातील सर्वोत्तम कार्य करणा-या सयोगिनी माहूरच्या भाग्यश्री वसंत भगत यांना प्रथम, किनवटच्या भारती झळके यांना द्वितीय तर हिमायतनगरच्या सिंधू लिंबेकर यांना तृतीय सन्मानपत्रासह संसारोपयोगी साहित्य देवून गौरविण्यात आले…

“हिमायतनगर, इस्लापूर, किनवट व माहूर या चार विभागातून उपस्थित असलेल्या हजारो महिला भगिनींच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाचे तंत्रशुद्ध सुत्रसंचालन सिंधू लिंबेकर यांनी प्रास्ताविक विशाल श्रोते तर आभार प्रदर्शन भाग्यश्री भगत यांनी केले.. यावेळी तीनही तालुक्यातील हजारो महिला भगिनींची उपस्थिती होती.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती लोकसंचालित साधन केंद्र किनवट चे व्यवस्थापक विशाल श्रोते यांच्यासह लेखापाल सिद्धीकी अझहर, सयोगिनी भाग्यश्री भगत, सिंधू लिंबेकर तसेच महानंदा पाटील यांनी परिश्रम घेतले…










