ईतर
वाई बाजार येथे नाली बांधकामावर भिषण दुर्घटना…
"जेसीबीच्या धक्क्याने भिंत कोसळून एक ठार ; दोन गंभीर"
किनवट/माहूर
वाई बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या नाली बांधकामावर जेसीबीच्या धक्क्याने नालीची भिंत कोसळून त्याखाली दाबल्या गेल्याने एकाचा मृत्यू, एक अत्यवस्थ तर एकजण गंभीर असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रवाना केले आहे..
आज दि. ३ रोजी वाई बाजार येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास येथील ग्राम पंचायतीकडून सुरू असलेल्या नाली बांधकामावर मजूरांसह मिस्त्री नाली बांधकामाचे काम करीत होते. तेवढ्यात बाजूला लेवलींगचे काम करीत असलेल्या जेसीबीचा टायर काम सुरू असलेल्या तथा कच्ची असलेल्या भिंतीच्या काठावर आल्याने संपुर्ण जेसीबीचा भार त्या कच्च्या भिंतीवर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे.. त्यामुळे जेसीबीचा संपुर्ण भार पडून नालीची एकेरी भिंत कोसळत कोसळत असल्याचे मजूरांच्या लक्षात आले. दरम्यानची परिस्थिती पाहून काही मजूर तेथून बाहेर निघण्यात यशस्वी झाले…
परंतू संजय किशन मडावी वय ५० वर्षे, शुभम भिमराव पेंदोर वय २५, व सुमित सिताराम मरापे वय १९ तिघेही रा. कोलामखेडा वाई बाजार ता. माहूर ह्या तिघांना बाहेर पडता न आल्याने तिघेही त्या भिंतीखाली दाबल्या गेेेले.. अथक प्रयत्नानंतर तिघांनाही बाहेर काढण्यात यश आले. संजय किशन मडावी व शुभम भिमराव पेंदोर यांना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर सुमितला वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देवून माहूरकडे वळवण्यात आले.. दरम्यान माहूर ग्रामीण रूग्णालयात डॉ. व्हि.एन. भोसले व डॉ. मरापे यांनी जखमींची पाहणी केली असता संजय किशन मडावी वय ५० यास मृत घोषित केले. तर सुमित ची प्रकृर्ती चांगली असली तरी शुभम भिमराव पेंदोर याची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने दोन्ही जखमींना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रेफर केले आहे..