दिवाळीच्या मुहुर्तावर किनवट-माहूर तालुक्यातील ‘हंगामी पत्रकार’ अँक्टीव्ह मोडवर ; प्रसिद्धीचा हव्यास असलेले फुकटे नेते मात्र ‘नॉट रिचेबल’….
"अधिकृत व नोंदणीकृत कोण..? बोगस व हंगामी पत्रकारांवर कारवाईसाठी लेखणीधारक पत्रकार मंडळी पुढे सरसावणार"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
दिवाळीच्या मुहुर्तावर किनवट-माहूर तालुक्यातील ‘हंगामी पत्रकार’ आता अँक्टीव्ह मोडवर आले असून जाहिरातीच्या नावाखाली स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा चंग बांधलेलेे काही महाभाग हंगामी पत्रकार ठेकेदारांसह खाजगी जाहिरातदार तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात अक्षरश: धुडगूस घालताना दिसून येत असल्याने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गणल्या जाणारी पत्रकारीता किनवट-माहूर तालुक्यात बनावट व कॉपीपेस्ट हंगामी पत्रकारांच्या उपद्व्यापामुळे पार पोखरून टेकुळ्यासारखी निघालेल्या या हंगामी पत्रकारांचे भन्नाट पीक हाडाच्या पत्रकारीतेसाठी अडचण..! सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी तर अधिकारी व नंबर दोन वाल्यांसाठी मात्र अवघड जागचे दुखणे बनल्याची भावना नियमित जाहिरातदार वर्गाकडून व्यक्त होत आहे. सोबतच अधिकृत व नोंदणीकृत कोण? हा प्रश्न देखील सर्वसामान्यांना भेडसावत असून जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृृृत व नोंदणीकृत पत्रकारांच्या नोंदीची यादी शासकीय व निमशासकीय कार्यालयाला देण्याची मागणी करणार असल्याचे लेखणीधारक पत्रकार मंडळींनी सांगितले आहे…
भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गणल्या जाणा-या माध्यमांत आता निव्वळ ‘वाटमारी’ सदृष्य कृती करण्याच्या भुमिकेतून काही महाभाग संपादकांबरोबरच त्याचे कॉपीपेस्ट चेलेचपाट्यांचे ऐन दिवाळीत धडाक्यात आगमन झाले असून दिवाळीच्या नावाखाली वर्षभर बिळात दडून बसलेले हंगामी पत्रकार आता अँक्टीव झाले आहेत….
कोणतेही माध्यम चालवताना दैनिक असो.. वा साप्ताहिक, मासिक असो वा वार्षिक… त्यांची सर्वस्वी दारोमदार जाहिरात व्यवसायावरच अवलंबून असते. त्यासाठी वर्धापन दिनाबरोबरच सणोत्सव तसेच प्रासंगिक समयी विविध ठिकाणाहून जाहिरात संकलन करून ते आपल्या माध्यमांतून छापून आणण्याचा माध्यम प्रतिनिधींचा प्रयत्न असतो… हीच बाब हेरून सद्यस्थितीत किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यात जणू **** गळ्यात पट्टा बांधल्याप्रमाणे अगदी सत्तर रूपयात बनवून दिले जाणारे आकर्षक “PRESS” कार्ड गळात घालून हंगामी व अडाणचोट स्वयंघोषित पत्रकार मंडळी रस्त्यावर उतरली असूूून यांचे पेपर अंक स्थानिक पातळीवर सोडाच परंतू, ठकाचे महाठक असलेल्या त्यांच्या संपादकाच्या तरी हातात पडतो का नाही..? याबाबत शंकाच असून पिडीएफ् पत्रकारीतेसोबत कधीही हातात न पडलेले दैनिक, साप्ताहिक, मासिक, पोर्टल, यु ट्यूब चैनल तसेच अगदी वॉटस्अप वरूनच पत्रकारीता करणारे काही अडाणचोट महाभाग पत्रकार मागील एक महिण्यांपासून विविध कार्यालयाभोवती गोंडा घोळत असल्याचे बोलके चित्र दिसून येत आहे….
यामुळे नियमित व हाडाच्या पत्रकारितेसाठी मोठी डोकेदुखी बनली असून येत्या काही दिवसात या अडचणींबाबत कठोर भुमिका घेवून या हंगामी पत्रकारांचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस विभागाला उचित मागणीचे निवेदन देणार असल्याचे जेष्ठ पत्रकार मंडळींनी सांगितले आहे….
…..तर दुसरीकडे अगदी गावच्या सरपंचांना अर्ज देतानाचा फोटो काढून त्याची बातमी जणू काही मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून मागणी केल्याप्रमाणे बातमी लागावी… अशी अपक्षा बाळगून विविध वृत्तपत्रांतून सतत वर्षभर प्रसिध्दीसाठी हलकटपणा करणारे स्वयंघोषित पुढारी मंडळी यावेळी जाहीरातीच्या धास्तीने मात्र “नॉट रिचेबल” असून मोठे समाजकार्य केल्याचा सतत आव आणणारी ही मंडळी आता भुमिगत होवून बसल्याची मनोरंजनात्मक बाब समोर येत आहे.. विशेष म्हणजे डोळ्यांना बारा हजाराचा गॉगल, गळ्यात चैन, बोटात अंगठ्या, व खिशात ठेवलेले बंडल… सोबतच कानाला शानदार मोबाईल लावून फोटो काढूून बॅनरबाजी करणारी ही नेतेमंडळी आता जाहिरातीच्या धास्तीने कवरेज क्षेत्राच्या बाहेर गेली आहे… अशात अंगावरचा थाटमाट हा सोन्याचांदीचा नसून भाऊ बेनटेक्स चा आहे हो..! हे सांगण्याचीही दुर्दैवी वेळ या लिडर मंडळीवर आली असल्याचा उपहासात्मक विनोद पत्रकार मंडळीतून चर्चिला जात आहे…..