‘कार व दुचाकीची समोरा समोर धडक’ ; पायाचे हाड मोडल्याने एक गंभीर… यवतमाळला हलविले…
"माहूर गडावरील श्री रेणुका देवी ते श्री दत्तशिखर मार्गावरील गरुड गंगा जवळ घडली घटना.."


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)


किनवट/माहूर
माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर ते श्रीदत्त शिखर संस्थान कडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुड गंगा नाल्यावरील पुलाजवळ भाविकांची येणारी कार आणि मौजे दत्त मांजरी कडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा उजवा पाय कंबरे खालून मोडल्याची गंभीर घटना दि 5 रोजी दुपारी 3.40 वाजता घडली आहे….
मौजे जोडगव्हाण ता. मालेगाव जि. वाशिम येथील भाविक आपल्या घरची कार क्रमांक एम. एच. 26 बी. एक्स. 4991द्वारे चालक चेतन गोवर्धन सोलव हे घरच्या मंडळींना घेऊन माहूर गडावर दर्शनासाठी आले होते. शिखर संस्थांनचे दर्शन करून परत येत असताना गरुडगंगा पूला जवळील वळणावर मौजे दत्त मांजरी तालुका माहूर कडे जात असलेले परमेश्वर राऊत व राजू पवार हे शारदा देवी विसर्जनासाठी कुंकवाचा थैला घेऊन आपली मोटरसायकल क्रमांक एम. एच. 26 ए. डब्ल्यू. 6414 वरून जात असताना वळणावर अचानक पणे समोर आलेल्या कारला जोरदार धडक बसली… यामध्ये परमेश्वर राउत खाली पडून त्याला गंभीर मार लागला.. त्यात त्याच्या उजव्या पायाचे कमरेखालून हाड मोडले…

सदरची घटना कळल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शरद घोडके, पो.उप नि. पालसिंग ब्राह्मण, पो.हे.काँ. गजानन चौधरी, दत्ता सोनटक्के, पवन राऊत, संघरत्न सोनसळे, होमगार्ड एस. पी. भगत, यु. बी. भगत, सलमान खान मजीद खान, पी. एस. मुरकुटे तसेच शेख गणी यांनी धाव घेऊन जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले… दरम्यान जखमीला माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर डॉ. अक्षय सांगळे यांचे सहपरिचारिकांनी प्रथमोपचार करून 108 द्वारे पुढील उपचारासाठी जखमींना यवतमाळ येथे हलविले..










