क्राइम
पिकावर तणनाशक फवारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू…..
"माहूर तालुक्यातील मुरली शिवारातील घटना; माहूर पोलीस ठाण्यात पडसा येथील चौघांवर गुन्हा दाखल..!"


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पिकावर तणनाशक फवारल्याने जाब विचारल्याच्या कारणावरून केलेल्या मारहानीत अखेर ‘त्या’ शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उगडकीस आली असून याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात पडसा येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
मारहाणीत मयत झालेले वृद्ध शेतकरी माणिक गंगाराम मडावी वय ८५ वर्षे यांचा मुलगा महादेव माणिक मडावी यांनी काल दि. ४ ऑक्टो. रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, त्यांचे वडील मयत शेतकरी माहूर तालुक्यातील मौजे मुरली शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेतातच राखणी करण्यासाठी तेथेच राहत होते.. तर चुलत भाऊ चिंतामण भिमराव मडावी यांचे शेताला लागुन पडसा येथील शेख सुलेमान व शेख माजीद यांचेही शेत आहे… दरम्यान दि. 22 सप्टें. रोजी सिलेमान हाशम शेख वय 55 वर्ष, मोसीन मजीद शेख वय 25 वर्ष, गुड्डु उर्फ वसीम मजीत शेख वय 23 वर्ष व मतीन सुलेमान शेख वय 24 वर्ष यांनी आमचे शेतातील पिकाचे तणनाशक औषध मारून नुकसान केले होते… ते नुकसान करीत असतांना माझे मयत वडीलांनी पाहीले होते. ती गोष्ट माझे वडील यांनी मला व आमचे रोजदार शेख रसूल यांनाही सांगितले होते… तेव्हा आमचे रोजदार यांनी वरील इसमांना विचारले कि, तुम्ही आमच्या शेताचा पराटीचे नुकसान का केले..? असे विचारले असता वरील इसमांनी आमच्या रोजदार शेख रसूल यास धमकी दिली होती कि, हो आम्ही तुमच्या शेताचे नुकसान केले आहे. तुम्ही जर कोणाला काही सांगितल्यास तुला व माणीकराव यास जिवाने मारून टाकू, असी धमकी दिल्याचे माझे रोजदार शेख रसूल यांनी मला व माझे वडील यांचे समक्ष सांगितले होते… परंतु आम्ही भिती फोटो रिपोर्ट दिला नाही… त्याच दिवशी दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी संध्या. मला फोनद्वारे माहिती दिली की, दुपारी अंदाजे 01.30 वाजताचे सुमारास तुमचे वडील व मी दोघे शेतात असतांना आपले शेतात येवुन तुमच्या वडीलास चौघांनी लाथा, बुक्क्याने, पोटात व छातीवर मारहाण केली. त्यामुळे तुमचे वडील खाली पडले होते. मी सोडवण्यास गेलो असता मला पण लाथाबुक्काने मारहान केली आहे…. असे जबाबात सांगितले आहे…
“त्यावेळी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ ला रेफर केले. दरम्यान झालेल्या गंभीर मारहाणीमुळे दिनांक 2 ऑक्टो. 2025 रोजी रात्री 10.30 वाजता उपचारादरम्यान माणिक मडावी वय ८० वर्षे यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 170/2025 कलम, 103(1), 352, 351(1), 351(2), 3(5) भारतीय न्याय संहिता.. तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम 3(1) (r) , 3(1)(s), 3(2) (va) अन्वये 1) सिलेमान हाशम शेख वय 55 वर्ष, 2) मोसीन मजीद शेख वय 25 वर्ष, 3) गुडु उर्फ वसीम मज्जीत शेख वय 23 वर्ष व 4) मतीन सुलेमान शेख वय 24 सर्व रा. पडसा ता. माहूर जि नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे….










