क्राइम
दत्तमांजरी येेेथे किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात….?
माहूर पोलीसांत दोन महिलांसह तेरा जणांवर गुन्हा दाखल..!


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होवून महिला व पुरूषांसह तब्बल तेरा जणांनी घरात घूसून संपुर्ण कुटुंबाला मारहान केल्याची खळबळजनक घटना माहूर तालुक्यातील मोजे दत्तमांजरी येथे काल दि. ५ रोजी घडली असून याप्रकरणी माहूर पोलीसांत दोन महिलांसह एकून तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथील गोपाल सुनिल राऊत वय 22 वर्षे यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार काल दि. 5 रोजी रात्री 08.00 वाजताचे सुमारास जुन्या वादातून सदरची भिषण घटना घडल्याचे सांगितले आहे.. घटनेच्या वेळी दोन महिलांसह एकूण तेरा जण ‘भाया’ असे नाव असलेला अँटो क्र. MH 26 K 3768 व दोन मोटार सायकल वरून आले व दत्तमांजरी येथील त्यांच्या घरात घुसुन सोबत आणलेल्या काठ्यांनी फिर्यादी गोपालसह त्याचा भाऊ कृष्णा राऊत, आई गंगाबाई सुनिल राऊत यांना शिवीगीळ करत मारहाण करण्यास चालु केली. तसेच व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकुन गावांतील संतोष बैनाजी राऊत, गोकूळ मारोती राऊत, बंडु रामजी चव्हाण हे आले व भांडणाची सोडवा सोडव केली. तेंव्हा वरील आरोपी निघुन गेले. या भांडणामध्ये माझे वडीलांना पाठीवर व पोटावर मारल्याचे वळ आहेत. सोबतच अनेकाना मारहान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तर फिर्यादीच्या वडीलांना जास्त मार लागल्याने सरकारी दवाखाना माहूर येथील डॉक्टरांनी पुढील उपचार कामी सरकारी दवाखाना यवतमाळ येथे पाठविले असल्याचे सांगण्यात आले आहे…
याप्रकरणी गोपाल सुनील राऊत वय २२ वर्षे यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गैरकायद्याची मंडळी जमा करून मारहाण करणा-या दोन महिलांसह तेरा जणांवर गु.र.नं. 171/2025 अन्वये भारतीय न्यायसंहितेचे कलम, 333, 115(2), 118(1), 189(2), 191(2), 190, 352, 351(1), 351(2) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप नि. पालसिंग ब्राह्मण यांच्यासह पो.हे.काँ. गजानन चौधरी हे करीत आहेत…..










