क्राइम
काळ्याबाजारात नेण्याच्या उद्देशाने वाहतुकीस सज्ज असलेल्या रेशनमालाचे वाहन पकडले…..
"बोलेरो पिकअपसह गहू व तांदळाचे ५६ कट्टे जप्त ; सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!"


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे वाहन सिंदखेड पोलीसांनी जप्त केले असून याप्रकरणी निरिक्षण अधिका-यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मदरसा परिसरात दि. २८ सप्टेंबर रोजी बोलेरो पिकअप एम.एच.२६ ऐ.डी. ३४२६ या वाहनातून रेशन तांदळाचे ४४ तर गव्हाचे १२ असे एकुण ५६ कट्टे टाकून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी वाहतुक करताना आढळून आले.. दरम्यान सिंदखेड पोलीसांच्या वतीने सदरची बाब तहसिल कार्यालयाला अवगत करून मालाची पाहणी करून खातरजमा केल्यानंतर काल दि. १५ रोजी माहूर तहसील कार्यालयाचे निरिक्षण अधिकारी एन. आर. राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४१/२०२५ कलम ३ व ७ जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये शे. आरीफ इब्राहिम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात जप्त केलेले बोलेरो पिकअप वाहन सिंदखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.. प्रकरणाचा तपास स.पो.नि. रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. दारासिंह चौहाण हे करीत आहेत…..










