सामाजिकईतर

पडसा येथील न्यायालयाने थांबवलेले ‘ते’ वादग्रस्त समाजमंदीर बांधकाम सुरू करण्यासाठी आजपासून महिलांचे आमरण उपोषण….

'न्यायप्रविष्ठ असलेल्या 'त्या' प्रकरणात महिलांना पुढे करून प्रशासनास वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न...?' 'न्यायालयीन लढाईत हताश झालेल्या 'त्या' स्वयंघोषित नेत्याचा रडीचा डाव ; प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   शेतकी वादाला सामाजिक स्वरूप देत समाजमंदीर बांधकामाच्या नावाखाली दोन कुटुंबाचा रस्ता बंद करण्याचा घाट घालून सुरू केलेले वादग्रस्त समाजमंदीर बांधकाम न्यायालयाने थांबविल्यानंतर न्यायालयीन लढाईत हताश झालेल्या ‘त्या’ स्वयंघोषित पुढा-याकडून रडीचा डाव खेळताना चक्क महिलांना पुढे करून न्यायप्रविष्ठ प्रकरणात प्रशासनाला वेठीस धरण्याच्या उद्देशाने न्यायालयाकजून थांबविलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाविरोधात आजपासून महिला आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन तहसीलदार माहूर यांना देण्यात आल्याने न्यायप्रविष्ठ असलेल्या ‘त्या’ प्रकरणात महिलांना पुढे करून प्रशासनास वेठीस धरणा-यांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे…
माहूर तालुक्यातील मैजे पडसा येथील तब्बल 46 महिलांची नावे असलेले निवेदन तहसीलदार माहूर यांना दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी देवून येथे मंजूर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास करणे अंतर्गत समाजमंदीराचे बांधकाम करणेसाठी आमरण उपोषणास बसत असल्याबाबत निवेदनात सांगितले आहे… त्यात नमूद केल्याप्रमाणे मौजे पडसा ता. माहूर जि. नांदेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत समाज मंदिर बांधकाम करणे या कामास -शासन निर्णय क्रमांक सा.वि.यो 2023 प्र.क्र. 365 दि 24/07/2023 नुसार समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी रुपये 20,00 लक्ष रुपये मंजूर झाले आहे. त्यानुसार मौजे पडसा येथील ग्रामपंचायत ने कामाच्या निविदा मागणी केल्या होत्या. त्या मधून श्री. शेख साकिब उज शेख महेमूद रा. वसंत नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांनी ग्रामपंचायत च्या करारनाम्याची पूर्तता केल्यामुळे निविदा मंजूर करून काम सुरु करण्याचे आदेश दिलेले आहे. व सदरील ठेकेदारांनी 20% रक्कम रुपये 4.00 लक्ष ( चार लक्ष) अग्रिम रक्कम उचल केलेली आहे. सदरील ठेकेदारांनी या रक्कमेतून रु.50,000 चे काम केलेले आहे. असेही निवेदनात उपोषणकर्त्यांनी सांगितले असून मागील 18 महिण्यांपासून थांबलेले हे बांधकाम त्वरीत सुरू करण्यासाठी महिलांचे आज दि. १३ ऑक्टोबर सकाळी 11:00 वा. पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे…. विशेष म्हणजे सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड यांच्या न्यायालयाने सदर प्रकरणात स्थगिती आदेश देवून काम थांबविलेले असल्याची उपोषणकर्त्यांच्या निवेदनात कुठेही उल्लेख नाही..
तर प्रकरणाच्या न्यायालयीन बाजूचा विचार केल्यास येथील वसंता नागोराव भगत यांच्या घराचा रस्ता बंद करण्याच्या उद्देशाने व शेतकी वादातून जन्मलेल्या या प्रकरणाला सामाजिक स्वरूप देवू पाहण्याचा रडीचा डाव येथील एक पांढरपेशी पुढारी खेळत असल्याचे वसंता भगत यांनी पोलीस ठाणे सिंदखेड येथे सदर उपोषणासंदर्भात सादर केलेल्या न्यायालयीन कागदपत्रासोबत दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे.. एवढेच नव्हे तर न्यायप्रविष्ठ प्रकरणात आमरण उपोषणाच्या नावाखाली सामाजिक वातावरण बिघडवून माझे घरावर सामूहिक हल्ला करण्याचा हेतू असल्याचीही तक्रार त्यांनी काल दि. १२ रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार समाजाच्या नावाखाली पुढारी म्हणून मिरवणाऱ्या ‘त्या’ पांढरपेशाने समाजातील काही लोकांना हाताशी धरून माझ्या घराच्या येण्या जाण्याचा रस्ता बंद करण्यासाठी घराच्या अगदी दारासमोर समाजमंदीराचे बांधकाम सुरू केले होते. त्यावेळी न्यायासाठी मी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून मा. न्यायालयात दावा क्र. 289/2024 अन्वये दावा दाखल असून सदर प्रकरणात मा. न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केला असून आजही स्थगिती आदेश कायम आहेत. सूदर प्रकरणी पुढील तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. तर सदरचे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ठ असून प्रकरणाची पुढील स्टेज साक्ष व पुराव्यासाठी आहे… सदर प्रकरणात न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही न्यायालयाच्या स्थगिती आदेश अवहेलना करून गावातील 70 ते 80 लोकांनी माझ्या घरासमोरील रस्ता बंद करण्याठी बांधकाम केल्याने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी याच न्यायालयात पडसा येथील 57 महिला व पुरुषांवर एम.ए. नं. 1297/2024 अन्वये अवमान याचीका (Contempt of court) दाखल असून ते देखील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाची पुढील तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे…
… वरील दोन्ही प्रकरणे मा. न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने गावातील व समाजातील शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने प्रकरणातील प्रतिवादींनी संगणमत करून व गावातील निरक्षर व भोळ्या भाबड्या महिलांना समोर करून न्यायप्रविष्ठ प्रकरणात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रत्यक्षात मात्र या उपोषणाच्या निमित्ताने समाजातील शांततामय वातावरणाला खराब करून माझ्या कुटुंबावर सामाजिक हल्ला चढविणे हाच एकमेव उद्देश असून आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयाच्या अंतिम आदेशाची प्रतिक्षा न करता अवास्तव मागणी करून प्रशासनाला वेठीस धरणा-यांंवर योग्य ती कार्यवाही करून माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणीही याचिकाकर्ते वसंता भगत यांनी केली आहे…
   विशेष म्हणजे न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यामुळे थांबलेल्या कामाची अग्रीम रक्कम ठेकेदाराकडून घेण्याचा संबंधित पांढरपेशा पुढा-याचा डाव असल्याचेही सांगण्यात येत असून अवमान याचिकेतील प्रतिवादींनी आता त्यांच्या घरातील महिलांना पुढे करून आमरण उपोषणाचा “गेम” आखल्याचे याचिकाकर्ते वसंता भगत यांनी सांगितले आहे.. याउलट न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयाने स्थगिती देवून थांबविलेले काम सुरू करण्यासाठी महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणा-या ‘त्या’ पुढा-याच्या बौद्धिक दिवाळखोरीची देखील प्रचिती येत असून एरव्ही लोकशाही व संवैधानिक मार्गाचा अवलंब करून केल्या जाणा-या सर्व आंदोलनाचा प्रशासन सन्मान करीत असले तरी न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणात प्रशासनास वेठीस धरू पाहणा-या या आंदोलनकर्त्यांवर प्रशासन काय कार्यवाही करते हे पाहणे आता रंजक ठरणार आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close