देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती…
हिंगोली लोकसभा कार्यसमितीत तरुण नेतृत्वाला संधी


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)


श्री क्षेत्र माहूर (प्रतिनिधी):
सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात राज्यभर उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या देवाभाऊ फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अपील बेलखोडे यांची देवाभाऊ फाउंडेशनच्या हिंगोली लोकसभा कार्यसमितीत माहूर तालुका सह-समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक श्री. गजाननदादा जोशी यांनी फाउंडेशनच्या केंद्रीय कार्यालयातून अधिकृतरीत्या जाहीर केली. त्याचबरोबर हिंगोली लोकसभा समन्वयकपदी श्री. शैलेश श्यामसुंदर नांदेडकर यांचीही निवड करण्यात आली आहे.

मुख्य समन्वयक जोशी यांनी सांगितले की, “देवाभाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे कार्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कामात अपील बेलखोडे यांच्यासारख्या सक्रिय कार्यकर्त्यांचा सहभाग फाउंडेशनच्या उद्दिष्टपूर्तीस निश्चितच गती देईल.”
देवाभाऊ फाउंडेशन हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वदेशी, सहकार, बुद्धिमत्ता आणि स्वावलंबन” या तत्त्वांवर आधारित समाजकार्य करीत असून, राज्य संयोजक आशिष घोलप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू आहे.
या नियुक्त्यांमुळे हिंगोली लोकसभा क्षेत्रातील संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होईल, तसेच स्थानिक युवकांमध्ये समाजसेवेची नवी प्रेरणा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निमित्ताने माहूर तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी अपील बेलखोडे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.










