(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मासेमारीसाठी दुचाकीवरून आलेल्या दोघांची व बसची आसोली फाट्यावर समोरासमोर धडक होवून दोघे गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना आज दु. ३ वा. च्या सुमारास घडली असून जखमींवर माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत..
आज दि. १२ रोजी माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर विदर्भातील बोरी गोसाई ता.जि. यवतमाळ येथील मासेमारीचा व्यवसाय करणारे मंगेश रमेश मेश्राम वय १८ वर्षे व राजेश कांबळे वय २३ हे माहूर तालुुुुुुुुक्यातील कसारपेठ येथे मासेमारीसाठी आले होते. यावेळी आसोली फाट्यावर थांबून बाजूच्या टपरीवरून खर्रा घेवून निघत असताना माहूर कडून किनवटकडे जात असलेल्या महामंडळाच्या बीड-किनवट या बसने त्यांना जोराची धडक दिली. दरम्यान जखमींना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांची प्रकृर्ती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून पुढील उपचारासाठी जखमींना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रवाना करण्याची प्रक्रीया सुरू आहे…