राजकिय

माहूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजमाध्यमांवर भावी उमेदवारांचा महापूर…..

"हावशे, गवशे, नवशे अन् नवखेही अँक्टीव्ह मोडवर ; विविध कार्यालयांत निवेदनांचा पाऊस"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

 

 

किनवट/माहूर

येत्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जि.प. व पं.स. चे गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असलेल्या उमेदवारांचा अक्षरश: महापूर येणार असल्याचे चित्र सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूूळ घालत असून हावशे, गवशे, नवशे त्याबरोबरच काही नवखेही अँक्टीव्ह मोडवर येवून गोरगरीब व शेतक-यांच्या प्रती कळवळा दाखवताना तहसील व पंचायत समिती कार्यालयात विविध मागण्यांसाठी निवेदनाचा पाऊस पाडत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे….

 

माहूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट असून वाई बाजार गट हा सर्वसाधारण तर वानोळा गट हा नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. यात वाई बाजार गटातील गोंडवडसा व वाई बाजार हे पंचायत समिती गण असून वानोळा गटातून वानोळा व हडसनी हे दोन आहेत.. पं.स. त्या या चार गणात वानोळा गण हा सर्वसाधारण महिलेसाठी तर हडसणी गण अनुसुचित जमाती महिलेकरीता आरक्षित झाला आहे. त्याचबरोबर वाई बाजार गण सर्वसाधारण तर गोंडवडसा गण हा ओबीसी करीता राखीव झाला आहे….यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे माहूर पंचायत समितीचे सभापती पद देखील सर्वसाधारण आहे…. त्यामुळे तालुक्यात पुरूष नेतेमंडळीसाठी एकमेव सर्वसाधारण असलेल्या वाई बाजार पंचायत समिती गणात तालुक्यातील दिग्गजांबरोबर माहूर पंचायत समीतीच्या सभापतीपदाची स्वप्ने पडत असलेली अनेक मंडळी सध्या वाई बा. परिसराच्या दौ-यावर असून भविष्यातील स्वप्ने रंगवत स्मितहास्य करताना दिसून येत आहे.

 

 

विशेष म्हणजे उर्वरीत गणांपैकी हडसणी हा अनुसुचित जमातीकरीता राखीव असलेला एकमेव गण वगळता वानोळा व गोंडवडसा हे गण देखील पंचायत समितीच्या भावी सदस्यमंडळीने खचाखच भरलेले असून पारंपारिक उमेदवारांच्या ‘उखाळ्या-पाखाळ्या’ काढत अनेक जुन्या चेह-यांबरोबरच नव्या चेह-यांचेही दोन्ही ‘हात जोडून’ असलेले फोटो सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालताना दिसत असून “हावशे, गवशे, नवश्यांबरोबरच नवखे देखील निवडणुकीच्या या प्रवाहात “लंबी सुरंग” मारण्याचा मानस उराशी बाळगताना दिसून येत आहेत. त्यामुळे सध्यातरी बेरीज व वजाबाकीचे जटील गणित जो तो आपापल्या परीने सोडवण्याच्या प्रयत्नात आकडेमोड करत असला तरीही पक्षाची उमेदवारी की अपक्ष..? यावरच त्यांचे अस्तित्व ठरणार आहे….

दरम्यान मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने अनेक दिग्गज मंडळी राजकीय बेरोजगारीचा अनुभव घेत होती. तर अनेक मंडळी पक्षभ्रमण करण्याच्या तयारीने फायदेशीर पक्षाचा शोध घेत होती. अशात गोरगरीबांच्या अडीअडचणी, शेतक-यांचे प्रश्न तसेच प्रशासकीय स्तरावर खोळंबलेल्या अनेक प्रश्नांना उजागर करण्यासाठी कुणी वालीच उरला नव्हता.. परंतू, जि. प. व पं. स. निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर अचानक जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक नेत्यांंची अक्षरश: त्सुनामी आली असून ‘कुणाकडूनतरी निवेदन लिहून घेवून’ तहसील व पंचायत समीती कार्यालयात निवेदन देतानाचे फोटो समाजमाध्यमांवर वायरल करून अनेकजण आपल्या भावी उमेदवारीचा प्रत्यय देताना दिसून येत आहेत…

 

   एकंदरीतच तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भावी उमेदवारीच्या प्रवाहात काही नेतेमंडीळींचे नाराज कार्यकर्ते नेत्यांची पाहून घेतो या अविर्भावासह डोळे टवकारत असून त्याबरोबरच इतरही हावशे, गवशे, नवशे अन् नवखेही अँक्टीव्ह मोडवर आल्याने परंपरागत व जुन्या नेतेमंडळींसाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी उमेदवारांना आवरता आवरता… ‘भिक नको, पण कुत्रा आवर..!’ हे म्हणण्याची दुर्दैवी वेळ दिग्गजांवर लवकरच येणार असल्याचे उपहासात्मक बोल जाणकारांकडून बोलल्या जात आहे.. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुर्वी नगरपालीकांची निवडणुक होणार असल्याचे संकेत शासन स्तरावरून मिळत असल्याने कदाचित या निवडणुका पुढे ढकलू शकतात या शक्यतेने दिग्गज मंडळी ‘दोस्ताना पक्का..! खर्चा अपना अपना..!!’ हे सुत्र ठेवून ‘चमडीबचाव’ धोरण अवलंबित असले तरी दिवाळीच्या मुहुर्तावर मात्र भल्याभल्यांचे दिवाळे निघणार असल्याचे मतदार मंडळीतून बोलले जात आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close