
माहूर, (नांदेड), प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त तसेच हिरासिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आसोली येथे भव्य रोग निदान शिबीराचे मोफत आयोजन यशस्वीरीत्या संंपन्न झाले असून शिबिरात 471 लोकाची मोफत तपासणी करण्यात आली.
माहूर तालुक्यातील मौजे आसोली येथे डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांची १३१ वी जयंती तसेच माजी सरपंच हिरासिंग चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नांदेड जि.प. चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह आयकॉन हाॅस्पीटल पुसद चे संचालक गजानन मॅडमवार, डॉ. राहुल जाधव, डॉ. सुदर्शन ठाकरे, डॉ. अरुण राठोड, डॉ. राहुल राठोड़, आसोलीचे माजी सरपंच अनिल रूणवाल, ज्योती हिरासिग चव्हाण, कैलाश बेहेरे, लक्ष्मण बेहेरे, वेणु अन्ना, सरपंच यमुना बाई राठोड़ आदींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुण अभिवादन केेेले.
यावेळी मोफत रोगनिदान शिबीरात तब्बल ४७१ जणांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी ग्राम.पं. पदाधिका-यांसह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

