सामाजिक

वाई बाजार येथे महात्मा फुले व ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी….

‘धम्ममय वातावरणात महामानवास मानवंदना..’

वाई बाजार…

(सुरज खोडके)
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असून बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत धम्ममय वातावरणात महामानवांना मानवंदना देण्यात आली.
आज दि. १४ एप्रिल भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून आज वाई बाजार येथे दोन्ही महापुरूषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. दीपवंश बौध्द विहार समिती, रमाई महिला मंडळ तसेच परिवर्तनवादी विचारमंच वाई बाजारच्या वतीने आयोजित या संयुक्त जयंती महोत्सवादरम्यान मुख्य चौकातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन जेष्ठ धम्मउपासक उकंडरावजी गायकवाड यांच्या हस्ते तर दीपवंश बौध्द विहार परिसरातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन दीपवंश बौध्द विहार समितीचे अध्यक्ष प्रल्हाद खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके, माजी उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण, अंबादास राजूरकर, दिपक कन्नलवार, यशवंत दळवे, कालिदास सोनुले, पत्रकार राजकुमार पडलवार, कैलाश बेहेरे, नावेद खान, विजय खडसे, प्रकाश खडसे, प्रा. विनोद कांबळे, अमजद खान पठाण, आकाश सातव, अमजद खान हैदर खान पठाण, कार्तिक बेहेरे, प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार सुभाष खडसे यांनी तर आभार प्रा. विनोद कांबळे यांनी मानले. जयंतीमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी दीपवंश बौध्द विहार समितीच्या पदाधिका-यांसह रमाई महिला मंडळाच्या भगिनी तसेच परिवर्तनवादी विचारमंचच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close