सामाजिक

22 मार्च रोजी किनवट येथे सर्वधर्मीय वधू वर, परिचय व विवाह मेळाव्याचे आयोजन…

"विधवा, परितक्त्या, विधूर, दिव्यांग तसेच घटस्फोटीत वधू वरांनी परिचय व विवाह मेळाव्याचा लाभ घेेेेेेेण्याचे आवाहन..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

(जयश्री भरणे)

किनवट,प्रतिनिधी

येत्या 22 मार्च रोजी किनवट येथे सर्वधर्मीय वधू वर, परिचय व विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या परिचय मेळाव्यात विधवा, परितक्त्या, विधूर, दिव्यांग तसेच घटस्फोटीत वधू वरांनी या परिचय व विवाह मेळाव्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेेेेेेेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे…

आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवटच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व धर्मातील गरजू, निराधार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विधवा, विधूर,परितक्त्या, घटस्फोटीत व दिव्यांगांचा उपवधू वर परिचय मेळावा तसेच विवाह मेळावा येत्या 22 मार्च 2024 रोजी किनवट येथील कलावती गार्डन येथे आयोजित केला असून या मेळाव्यात मागील वर्षी मराठवाडासह विदर्भ, तेलंगणा तसेच परराज्यातून 100 पेक्षा जास्त उपवधू-वर सामील झाले होते. त्यामुळे येत्या २२ मार्च रोजी होणार असलेल्या या उपवर वधू परिचय मेळाव्यास सर्वच धर्मातील येणा-या उपवर वधूंची संख्या निश्चितच लक्षणीय असणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा जास्तीत जास्त प्रमाणात गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक जयश्री भरणे यांनी केले आहे..

 

 

 

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी…

१. बायोडाटा (दोन प्रती)

२. आधार कार्डाची छायांकित प्रत

३. घटस्पोटित असल्यास न्यायालयाचा निकाल / विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला..

४. दिव्यांग असल्यास प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे.

– इच्छूकांनी तसेच गरजूंनी मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घेेेेेेेेेण्यासाठी वरील कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रा.जयश्री भरणे यांनी केले आहे… 

 

 

 विशेष म्हणजे यावर्षी होणा-या मेळाव्यात आधार संस्थेच्या वतीने मेळाव्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना सोन्याचे मनी-मंगळसूत्र तसेच जोडवे देण्यात येणार आहेत. याशिवाय गरीब, विधवा महिलांना साडी तसेच शिलाई मशीनचे वाटप देखील करण्यात येणार आहे. तथापि, या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे अनेक इच्छुकांना एकाच छताखाली आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळणार असून आजच्या धावपळीच्या युगात विधवा, परित्यक्ता किंवा दिव्यांग व्यक्तींना पुन्हा संसार थाटण्याचे दिव्यस्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. त्यामुळे आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने या सर्वधर्मीय उपवधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात केवळ परिचयच करून दिला जाणार नाही. तर जोडीदारांची पसंती झाल्यास नातेवाईकांच्या संमतीने विवाह अथवा पुनर्विवाह लावून दिला जाणार आहे.. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close