Uncategorizedक्राइम

अवैध दारू वाहतुकीवर सिंदखेड पोलिसांचा  दणका…!

"१ हजार देशी दारूच्या बाटल्या जप्त ; स्कूटीसह १.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन या शिर्षकाखाली सुरू असलेल्या विशेष मोहीमेत अवैध दारू वाहतुकीला पुन्हा एकदा सिंदखेड पोलिसांनी जोरदार दणका देत तब्बल १ हजार देशी दारूच्या बाटल्यांंसह दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी स्कुटी  असा १.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून अवैध दारू व्यावसायीकांत एकच खळबळ उडाली आहे. 

 काल दि. ९ सप्टेंबर रोजी सिंदखेड पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिंदखेड – चिंचखेड या मार्गावरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिंदखेड-चिंचखेडकडून रामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रामपूर येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला. यावेळी MH-29-BT-3131 क्रमांकाच्या स्कूटीवरून नेत असलेल्या मालाची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या तब्बल १ हजार बाटल्या आढळून आल्या. यावेळी पोलीसांनी दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कूटी असा एकूण ₹१,०२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला…
“या कारवाईप्रकरणी करण प्रल्हाद बोटरे वय २२ वर्षे, व दुर्गेश विजय दुतकर वय २१ वर्षे दोघेही रा. नवीन कापेश्वर ता. आर्णी जि. यवतमाळ या दोघांविरूद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिंदखेड पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे यांच्यासह पो.ना. कोंडापलकुलवार, पो.काँ. इंगळे, चालक/होमगार्ड राठोड यांनी पार पाडली. या कारवाईने परिसरातील अवैध दारूची वाहतूक व विक्री करणा-यात एकच खळबळ उडाली असून यामुळे परिसरातील अवैध दारू विक्री व वाहतुकीला निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे..
“विशेष म्हणजे या विशेष मोहीमेतून पोलीसांनी लक्षवेधी कारवाई केली असली तरी केवळ वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई न करता दारूचा मूळ स्रोत कोणता होता..? हस्तगत केलेला माल हा नेमका कोणत्या दुकानातून विकला गेला..? कोणाच्या नावाने बिल झाले…? किती बॉक्स दिले..? या विक्रीची दुकानाच्या स्टॉक रजिस्टरमध्ये नोंद आहे का..? आणि खरेदीदाराकडे वैध परमिट होते का..? हे तपासणे अत्यंत आवश्यक असून प्रथमदर्शनी अवैध दारू वाहतुक करणारे दोघे जण पकडले गेले असले तरी, एवढ्यावरच न थांबता पकडण्यात आलेल्या दारूचा मुख्य स्त्रोत अर्थात विक्री केलेल्या ‘त्या’ परवानाधारक दुकानदारावर देखील कारवाई व्हावी. अशी माफक अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close