ईतर

नियमित आरोग्य तपासणी करून परत येत असलेल्या कलाणे कुटुंबियांच्या वाहनाला यवतमाळ जिल्ह्यात भिषण अपघात ; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, तिघे जखमी…

"यवतमाळ जिल्ह्यातील किनी उड्डाणपुलावरील दुर्दैवी घटना ; मोकाट जनावरांना वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   यवतमाळ येथे नियमित आरोग्य तपासणी करून परत येत असलेल्या वाई बाजार येथील कलाणे कुटुंबियांच्या वाहनाला मोकाट जनावराला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून व त्याच कालावधीत मागील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेेने भिषण अपघात झाला असून या भिषण अपघातात आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर यात तिघे जण जखमी असल्याने त्यांना यवतमाळच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत..
 आज दि. १९ रोजी सकाळी वाई बाजार येथील प्रतिष्ठित व्यापारी सुनिल नत्थूजी कलाणे यांच्यासह त्यांचे धाकटे बंधू अनिल नत्थूजी कलाणे व मनोज यशवंत कलाणे (चालक) हे त्यांची मातोश्री लक्ष्मीबाई नत्थूजी कलाणे यांना घेवून यवतमाळ येथे त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते.  दरम्यान लक्ष्मीबाई यांची आरोग्य तपासणी करून माहूरकडे परतत असताना यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही गावाजवळील उड्डाणपुलावर अचानक त्यांच्या गाडीसमोर मोकाट जनावर आले. त्यावेळी त्या मोकाट जनावराला वाचविण्यासाठी चालक मनोजने तातडीने जोराचा ब्रेक लावला. त्यात ते मोकाट जनावर वाचले, परंतू त्याच वेळेत मागून येत असलेल्या भरधाव वेगातील बेसावध वाहनाचे नियंत्रण सुटले व कलाने यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.  या धडकेने कलाने यांची गाडी मुख्य महामार्गापासून जवळपास शंभर ते दिडशे फुट अंतरावर ‘कोलांट-उड्या’ मारत फेकली गेली. त्यात त्याच्या वाहनाचा अक्षरश: चुराडा झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती आहे..
या दुर्दैवी घटनेत लक्ष्मीबाई नत्थूजी कलाने वय 87 (अंदाजे) यांचा जागीच मृत्यू झाला असून सुनील नत्थूजी कलाणे यांच्यासह अनिल व चालक मनोज हे देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांना यवतमाळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर मयत लक्ष्मीबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात नेल्याचे समजते.

 

“विशेष म्हणजे, अगदी ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसागणीक गंभीर होत चालला असून भर रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या मुक्तसंचारामुळे वाहनचालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच केवळ मोकाट जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात आज झालेली ही घटना मनाला चटका लावून जाणारी असून, मोकाट जनावराला वाचवण्यासाठी अपघातग्रस्त वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावला..तेवढ्याच वेळ मागून वेगात येणान्या दुस-या कारचालकाचे नियंत्रण सुटून पाठीमागून जोराची धडक दिली.. त्यामुळे अपघातग्रस्त वाहना तब्बल चार ते पाच पलट्या खाऊन  रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यात निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला… याबाबत स्थानिकांची प्रतिक्रिया घेतली असता घटनास्थळ परिसरात मोकाट जनावरांमुळे यापुर्वी देखील अनेक अपघात झाले असून,  होण्याची ही यापुर्वीदेखील अनेकदा याठिकाणी जनावरांमुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत. स्थानिक प्रशासन तसेच महामार्ग प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज एका निरपराध वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रशासनाने मोकाट जनावरांच्या वहिाटीकडे तातडीने लक्ष देवून प्रभावी उपाययोजना करून यापुढील संभाव्य अपघात टाळून निरपराधांचा बळी जाण्यापासून रोखावे.. अशी माफक अपेक्षा प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केली जात आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close