ईतर

गोंडवडसा नजीक दुचाकीचा भिषण अपघात ; एक ठार, एक गंभीर

"लग्नसमारंभ उरकून परतत असलेल्या बापलेकांवर नियतीची वक्रदृष्टी"

(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

लग्नसमारंभ उरकून गावाकडे परतत असलेल्या बापलेकांच्या दुचाकीस भिषण अपघात होवून बापाचा जागीच मृत्यू तर मुलगा अत्यंत गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

आज दि. २४ रोजी सायं ६:०० वा. च्या दरम्यान पालाईगुडा ते गोंडवडसा या दरम्यान असलेल्या गोंडवाडी फाटा या पुलावर आर्णी तालुक्यातील मौजे देऊरवाडी येथील वसंता पेंदोर वय अंदाजे ६० वर्षे व त्यांचा मुलगा प्रविण वसंता पेंदोर वय ३२ वर्षे हे दोघेही किनवट तालुक्यातील सारखणी नजीक असलेल्या दहेली येथे एका लग्नसमारंभासाठी आले होते.
लग्न समारंभ आटोपून सायंकाळी सहाच्या सुमारास सारखणीवरून माहूरकडे जात असताना दुचाकी चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पालाईगुडा ते गोंडवडसा यांच्या मध्ये असलेल्या गोंडवाडी फाट्यावरील पुलावरून दुचाकी थेट नाल्यात जाऊन पडली.. यात वसंता पेंदोर यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा प्रविण पेंदोर हा गंभीर असल्याने त्यास माहूरच्या ग्रामीण रूग्णालयाकडे रवाना केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले आहे.

घटनेची माहीती सिंदखेड पोलीसांना कळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह ना.पो.काँ. पठाण व पो.काँ. संजय शेंडे यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. तसेच यातील मयताला शवविच्छेदनासाठी वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असल्याची अधिकृत माहिती आहे.
वृत्त लिहीपर्यंत सिंदखेड पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याने याबाबतची अधिक माहिती प्राप्त होवू शकली नाही.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close