ईतर

धक्कादायक..? माहूर नगरपंचायतीचा आणखी एक कारनामा..!! रस्ता एकच, पण दोन वेगवेगळ्या नावाने रस्ते मंजूर.. तब्बल 84 लाखांच्या रस्ते निधीच्या लुटीचा संशय…..!!

माहूर नगरपंचायतीत एकाच रस्त्याच्या दोन वेगवेगळ्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह...! नगरसेवक प्रा. भंडारे यांची खळबळजनक तक्रार..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

माहूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील सी.सी. रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या नावांचा वापर करून मंजुरी देण्यात आल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी माहूर नगरपंचायतीचे नगरसेवक प्रा. विलास भंडारे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

माहूर न.पं.चे नगरसेवक प्रा. विलास भंडारे यांनी माहूर न.पं. च्या मुख्याधिका-यांना दिलेल्या लेखी पत्रानुसार, संबंधित रस्त्याच्या कामासंदर्भात प्रभाग क्रमांक २ च्या नोंदीत एक रस्ता पन्नास लाख रुपयांच्या मंजुरीचा उल्लेख असल्याचे, तर प्रभाग क्रमांक १ मधील कामासाठी चौतिस लाख रुपयांची रक्कम नमूद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या नोंदी नेमक्या कोणत्या कामांशी संबंधित आहेत..? मंजुरी कोणत्या आधारावर देण्यात आली..? आणि प्रत्यक्षात काम कुठे करण्यात आले..? याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असून, एकाच कामाची दुहेरी नोंद की स्वतंत्र कामे हा प्रश्न प्रामुख्याने समोर येवून ठेपला आहे… तथापि, या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, संबंधित नोंदी एकाच रस्त्याच्या कामाशी संबंधित आहेत की दोन स्वतंत्र कामे आहेत..? जर कामे स्वतंत्र असतील, तर त्यांची मंजुरी, अंदाजपत्रके, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष कामाची ठिकाणे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मात्र, एकाच कामाची वेगवेगळ्या नावांनी नोंद किंवा मंजुरी झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास, त्यामागील कारणांची जबाबदारी निश्चित करावी लागणार आहे…
विशेष म्हणजे, या प्रकरणातील अंतिम तपासासाठी केवळ कागदोपत्री मंजुरीच पुरेशी नसून प्रत्यक्ष कामाचीही तपासणी होणे गरजेचे आहे.. तर नगरपंचायतीच्या सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त होती का..? हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी संबंधित रस्त्याच्या कामाचे मंजुरी आदेश, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका, देयके आणि प्रत्यक्ष स्थळपाहणी यांची एकत्रित तपासणी होणे गरजेचे आहे. तर माहूर नगरपंचायतीतील विकासकामांचा कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, प्रभाग क्रमांक १ मधील सी.सी. रस्त्याच्या कामासंदर्भात ₹५० लाख रूपये किमतीचा हा रस्ता गजानन भारती  ते जावेद फ्रुट कंपनी या नावाने प्रभाग क्र. दोन मध्ये…तर शंकर जोशी यांचे घर ते चिल्लेकर यांचे घर असे नाव देवून दुसरी  ₹३४ लाख रूपये किमतीची मंजूरी.. अशा दोन वेगवेगळ्या मंजुरींच्या नोंदींचा मुद्दा प्रा. भंडारे यांनी समोर आणला आहे…परिणामी माहूर  नगरपंचायतीच्या प्रशासकीय पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रस्ता एकच असेल, तर मंजुरी दोन कशासाठी..? आणि कामे स्वतंत्र असतील, तर त्यांचे ठोस पुरावे कुठे..? या प्रश्नांची उत्तरे आता नगरपंचायत प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. त्यामुळे माहूरच्या राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून माहूर न.पं. चे मुख्याधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात..? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान तक्रारी निवेदनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणार..? मंजुरीतील संभाव्य तफावतीची चौकशी करणार…? दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करणार..? का मागील अनेक प्रकरणांसारखे मुग गिळून गप्प बसणार..हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, या निमित्ताने माहूर नगर पंचायतचे नगरसेवक प्रा. विलास भंडारे यांच्या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close