ईतर

माहूर गडाच्या पायथ्याशी वाहतुकीला अडथळा करणा-या १२ दुचाकी जप्त..!

"पोलीस आणि नगरपंचायतीची संयुक्त कारवाई; प्रत्येक वाहनावर ३ हजारांचा दंड..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुकादेवी मंदीराच्या पायथ्याशी बेशिस्तीने वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या 12 दुचाकींवर पोलीस व न.पं. प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली असून या बेशीस्त वाहनांवर प्रत्येकी 3 हजार रू. प्रमाणे दंड आकारून 36 हजारांचा दंड वसूल केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..
शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरी श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दरम्यान येणा-या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये किंबहूंना भाविकाचे दर्शन सुकर व्हावे या उदात्त हेतून मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाने कंबर कसली आहे.. दरम्यान आज दि. 12 रोजी गडाच्या पायथ्याशी बेशीस्त पद्धतीने लावण्यात आलेल्या दुचाकींमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शरद घोडके यांच्यासह पोलीस अंमलदार खंदाडे, राऊत, दरंगे, होमगार्ड मुरकुटे, भगत, कांबळे, जाधव..तसेच माहूर नगर पंचायतचे विशाल ढोरे, संदीप गजलवार, विजय शिंदे व इतर कर्मचा-यांच्या संयुक्त पथकाने यात्रेदरम्यान वाहतुकीस अडथळा करणा-या 12 दुचाकी ताब्यात घेतल्या असून प्रत्येकी तीन हजार रूपये प्रमाणे एकूण 36 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे..
दरम्यान शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून भाविकांनी आणि वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या कारवाईच्या निमित्ताने प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर वाहतूक नियमांचे पालन न करणा-यांवर यापुढेही कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा पोलीस निरिक्षक देविदास चोपडे यांनी दिला असून यात्रेदरम्यान वाहतूक नियमास अडथळा करणा-यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसल्याचेही पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे….
“विशेष म्हणजे, शारदीय नवरात्रौत्सव काळात वाहतुकीला अडथळा होवू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खाजगी वाहनांना गडाकडे जाण्यासाठी पुर्णपणे बंदी करून भाविकांना दर्शनासाठी एस.टी. बसेसचा पर्याय खुला केला आहे. तर गडावरील व्यापारी, पत्रकार व काही ठराविकांना वाहनपास जारी केल्या आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील टि.पॉइंट पासून ते गडाच्या पायथ्यापर्यंत कर्मचा-यांचा फौजफाटा उभा आहे.  परंतू, असे असतानाही वाहतुकीस अडथळा करणा-या या दुचाकींना प्रवेश कसा मिळाला..? याबाबत पोलीस प्रशासनाने विचार करण्याची गरज असून येत्या काही दिवसांतील भाविकांच्या वाढत्या गर्दीचे शक्यतेचा विचार करता बेशिस्त वाहनांना वेळीच आवर घालणे गरजेचे असून, ‘हावसे-गवसे-नवसे’ मंडळीच्या बेशिस्त व विनापरवाना घुसखोरी करणा-या वाहनांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भुमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close