सामाजिक

वाई बाजार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या महिला व युवक शाखांची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर..!

"ॲड. छंदक वाठोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ; महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे महिला व युवक शाखांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली असून माहूर तालुका अध्यक्ष ॲड. छंदक वाठोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाजप्रबोधन, संघटनात्मक बळकटीकरण आणि बौद्ध संस्कारांच्या प्रसाराची जबाबदारी नव्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आली आहे. 

काल दि. ११ ऑक्टो. रोजी वाई बाजार येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा शाखा माहूरचे तालुकाध्यक्ष विधिज्ञ छंदकजी वाठोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात महिला व युवक कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. यावेळी युुवक शाखेच्या कार्यकारिणीतील युवक शाखेच्या अध्यक्षपदी अनाथपिंडिक कंधारे, उपाध्यक्षपदी संदेश खडसे, सचिवपदी अविनाश पठाडे, कोषाध्यक्षपदी सागर खडसे, कार्यालयीन सचिवपदी प्रफुल खडसे, तर हिशोब तपासणीसपदी सिद्धार्थ खडसे यांची निवड करण्यात आली. तर याशिवाय सचिव (पर्यटन) अजय खडसे, सचिव (महिला) प्रज्ञा अनाथ कंधारे, सचिव (संरक्षण) विशाल खडसे यांच्यासह विजय खडसे, यश खडसे, सुमेध खडसे, दीपक खडसे, आदित्य खडसे, रोहन पारधे, मिलिंद गायकवाड, सौरभ खडसे आणि श्रीकांत मुजमुले यांची संघटक म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली. तर महिला शाखेच्या कार्यकारिणीची निवड करताताना महिला शाखेच्या अध्यक्षपदी शिला वाठोरे, उपाध्यक्षपदी रेखा खडसे, सरचिटणीसपदी गौतमी थोरात, कोषाध्यक्षपदी छब्बूबाई पठाडे, कार्यालयीन सचिवपदी कल्पना पारधे, तर हिशोब तपासणीसपदी वैशाली खडसे यांची निवड करण्यात आली. तर याव्यतिरिक्त सचिव (संस्कार) वंदना भगत, सचिव (पर्यटन) सुलोचना खडसे, सचिव (महिला) रंजना खडसे, सचिव (संरक्षण) सीमा खडसे यांच्यासह मंगला खडसे, बेबीबाई तायडे, प्रियंका कंधारे, रंजना पारधे, जयश्री खडसे, शीलाबाई खडसे आणि सपना खडसे यांची संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे, बौद्ध धम्माची शिकवण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे, महिला व युवकांचे संघटन मजबूत करणे आणि कुटुंबात बौद्ध संस्कार रुजविणे या उद्दिष्टांसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे, असे मार्गदर्शन व आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याबरोबरच उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भावी सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यामुळे नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून वाई बाजारसह माहूर तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि व्यापक होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे माहूर तालुका अध्यक्ष ॲड. छंदक वाठोरे उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे, विहार समितीचे अध्यक्ष प्रल्हाद खडसे, दिलीप पठाडे, सिद्धार्थ पारधे, मिलिंद कंधारे, मुनेश्वर थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक उपासक व उपासिका उपस्थित होते.
विशेष म्हणजे, वाई बाजार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या महिला व युवक शाखांची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर होणे, ही केवळ पदाधिकाऱ्यांची निवड नसून समाजप्रबोधन, बौद्ध धम्माचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी आहे. किंबहूंना भारतीय बौद्ध महासभेचे कार्य केवळ कार्यक्रम आयोजित करणे, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे किंवा जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केलेल्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या दिशेने असणे महत्त्वाचे असून बौद्ध महासभेची अधिकृत घटना, नियमावली आणि संघटनेने निश्चित केलेली उद्दिष्टे यांचा संदर्भ घेऊन पुढील धोरणात्मक कर्तव्ये समजाऊन घेवून ती यशस्वीरित्या पार पाडण्याचा संकल्प नवनिर्वाचित पदाधिका-यांनी यावेळी केला आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close