सामाजिक

दिवाळीचा गोडवा पोहोचला थेट गोरगरिबांच्या दारात..!

"माहूर तालुक्यात शिंदे सेनेचा घरपोच शिधा वाटप उपक्रम..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

राज्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या दिवाळी शिधा वाटप उपक्रमाला माहूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मराठवाड्याचे उपनेते ना. हेमंत भाऊ पाटील आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुढाकारातून माहूर शहरासह तालुक्यातील गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीचा शिधा पोहोचविण्याचे काम शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
राज्यातील प्रतिकूल दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर सण साजरा करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलावा, त्यांच्या घरातही सणाचा गोडवा निर्माण व्हावा, या भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषत: केवळ औपचारिक वाटप न करता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिवाळीचा शिधा सुपूर्द करीत असून, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभेच्छांसह घरपोच मिळणाऱ्या या दिवाळी भेटीमुळे गरजू कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

“नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक पात्र गरजू कुटुंबापर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा, यासाठी आमदार हेमंत पाटील यांनी विशेष लक्ष घातले असून माहूर शहरातून या शिधा वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तथापि, सत्तेच्या राजकारणापलीकडे जाऊन सणाच्या आनंदात गरजू कुटुंबांनाही सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम असल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे घरपोच दिवाळीचा शिधा मिळाल्याने अनेक गरजू नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार हेमंत पाटील आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शिंदे सेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आहेत…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close