ईतर

सारखणी जवळ दोन दुचाकींचा भिषण अपघात ; एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी…

"सारखणी- माहूर राष्ट्रीय महामार्गावरील पालाईगुडा फाट्यावरील घटना.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

किनवट/माहूर

एकामागोमाग जात असलेल्या दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने एकमेकांना धडकून झालेल्या भिषण अपघाता एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील पालाईगुडा फाट्यावर आज रोजी घडली..

 

आज दि. १७ रोजी दुपारी 12 वा. च्या दरम्यान सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावरील पालाईगुडा फाट्याजवळ एका मागोमाग जाणाऱ्या दोन मोटरसायकलींना मागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गोंडवडसा येथील एक जण जागीच ठार झाला. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने गोंडवडसा गावावर शोककळा रसरली आहे. दरम्यान आज दुपारी गोंडवडसा येथील गजानन शंकर आशेवाड वय 35 वर्षे, कुंदन किशोर बावणे वय 30 वर्षे, व अतुल रमेश बावणे वय 20 वर्ष हे तिघेजण सारखणी येथून पालाईगुडा फाटा मार्ग गोंडवडसा येथे स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एम.एच. 26 बी आर 9154 वर जात होते. त्याचवेळी त्याच्या दुचाकीच्या अगदी मागेपुढे जात असलेली व अपघाताच्या वेळी समोर असलेली दराटी ता. किनवट येथील स्प्लेंडर प्रो दुचाकी क्र. एम.एच. 29 ए.क्यू. 9140 वर असलेले दराटी येथील दोघेजण मागे पुढे जात होते.

 

 

त्याचवेळी पालाईगुडा फाट्यावर गोंडवडसा येथील दुचाकीला मागून येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने ती मोटरसायकल समोर जाणाऱ्या मोटरसायकलवर जाऊन धडकली. त्यामुळे दोन्ही मोटरसायकल वरील पाचही जण रस्त्यावर पडले पाचही जणांना गंभीर दुखापती झाल्या. त्याचवेळी संधी साधून दडक दिलेले अज्ञात वाहन त्याठिकाणाहून पोबारा करण्यात यशस्वी झाले… त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना घटनेेेची माहीती सिंदखेड पोलीसांना दिल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्य्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे आणि त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमीना दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया जुने यांनी गजानन आशेवाड यांना मृत घोषित केले. तर इतर दोघांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद व यवतमाळकडे पाठविले…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close