ईतर

माहूरच्या ‘त्या’ पिडीतेला स्वयंघोषित नेत्यांची धमकी..? तक्रार मागे घे..! अन्यथा जिवानिशी मारून टाकू..! ; समाजाचे स्वयंंघोषित नेते पाठबळ देण्याऐवजी ‘दलाली’त अडकले..!

"स्वयंघोषित नेत्यांच्या धमक्यांमुळे पीडित दिव्यांग महिलेची SC/ST आयोगासह गृहमंत्र्यांकडे संबंधितांच्या नावानिशी तक्रार...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    पतीचे हरवलेले छत्र, कर्त्या तरुण मुलाचा अचानक झालेला मृत्यू, स्वतः ४९% शारीरिक अपंगत्व असे  नियतीने एकामागून एक दिलेले भीषण धक्के पचवत न्यायासाठी धडपडत असणा-या माहूर येथील अँट्रोसिटी प्रकरणातील ‘त्या’ पिडीतेला स्व समाजातील काही दलाली करणा-या स्वयंघोषित नेत्यांनी धमकी दिल्याची खळबळजनक बाब पिडीतेने उजागर केली असून ‘त्या’ असहाय्य पिडीतेला मदत करण्याऐवजी चक्क विरोधकांकडून दलाली खाऊन थेट पिडीतेलाच धमकी देत, ‘तक्रार मागे घे..! अन्यथा जिवानिशी मारून टाकू..! अशी थेट धमकी महिलेच्या एका नातेवाईकाजवळ दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माहूर शहरातील बहुचर्चित अँट्रोसिटी प्रकरणातील पिडीत दिव्यांग महिला नंदा भिमराव पाईकराव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह अनुसुचित जाती / जमाती आयोग महाराष्ट्र राज्य तसेच अँड. बाळासाहेब आंबेडकर यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीतून सदरचा खळबळजनक आरोप केलेला असून संबंधित धमकी देणा-या दलालांना प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान एका विधवा, दिव्यांग, असहाय्य व अशिक्षित अनुसूचित जातीतील महिलेचे हक्काचे घर बळकावण्यात आल्याच्या पार्श्वभुमिवर माहूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील आरोपी व त्याच्या राजकीय वरदहस्तांनी केलेल्या संपुर्ण अन्यायकारी करामतीचा लेखाजोखा पुराव्यासह अर्जासोबत जोडला असून पीडित महिला नंदा पाईकराव यांच्यावर झालेला हा अन्याय केवळ एका वैयक्तिक मालमत्तेच्या बळकवण्यापुरता मर्यादित उरलेला नाही, तर तो आपल्या व्यवस्थेच्या सडलेल्या मानसिकतेचे आणि समाजकारणाच्या नावाखाली चाललेल्या लाचार दलालीचे विदारक वास्तव उघडे पाडणारा आहे.
★ [ स्वयंघोषित नेत्यांची लाजीरवाणी दलाली..]
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे स्थानिक पातळीवरील तथाकथित आणि ‘स्वयंघोषित नेत्यां’ची भूमिका..! अन्यायाविरुद्ध तडफडणाऱ्या एका निष्पाप आणि दिव्यांग महिलेला धीर देऊन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी, हे नेते भीतीच्या सावटाखाली असलेल्या पीडितेवर तडजोडीसाठी दबाव आणत असल्याचे भयान वास्तव यानिमित्ताने पुढे आले  आहे. परिणामी न्यायाची भूमिका घेण्याऐवजी दलालाप्रमाणे मध्यस्थी करू पाहणाऱ्या स्वार्थी आणि संधीसाधू नेतृत्वामुळे आज ही महिला अक्षरश: खचली असून, तिला समाजाच्या उपेक्षेला कंटाळून बाहेर गावी जावे लागले आहे. तथापि, अन्यायापेक्षाही या अपमानास्पद उपेक्षेची वेदना अधिक दाहकता जास्त असल्याचे वेदनादायी वास्तव तिने आमच्या माध्यमाजवळ बोलून दाखवले असून आरोपीच्या वतीने सुपारी घेवून समाजाच्या स्वयंघोषित दलाल नेत्यांकडून येत असलेल्या धमक्या व न्यायाचे सर्व रस्ते बंद करण्याच्या उद्देशाने माहूर शहरात सुरू असलेला दलालीचा खेळ पाहता, सदर पिडिता भितीच्या सावटाखाली असून तिला चक्क बाहेरगावी नातेवाईकांकडे आश्रयाला जायची वेळ आली आहे.. विशेष म्हणजे, सदर पिडीत महिला आपल्या नातेवाईकाच्या घरी आश्रयाला गेल्यानंतर समाजाच्या दलालांनी तिथे जाऊन तिला दिलासा देण्याऐवजी चक्क तडजोडीची भाषा..व त्यानंतर तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याची खळबळजनक बाब मुख्यमंत्र्यांंसह अनुसुचित जाती जमाती आयोग व वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केला आहे. त्यामुळे प्रकरण नेमके कोणते वळण घेते..? याकडे संपुर्ण तालुका वासियांचे लक्ष लागले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close