क्राइम

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणा-या इसमावर कारवाईसाठी २१ सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा..!

"ईवळेश्वर येथील नंदकुमार कांबळे यांचे पोलीस ठाणे माहूरला लेखी निवेदन.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    पत्नी व मुलीला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असून, प्रकरणातील पुरावे व साक्षीदारांचे जबाब बदलण्यासाठीही दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप नंदकुमार किशन कांबळे (रा. ईवळेश्वर, ता. माहूर) यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास २१ सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, माहूर येथे आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

    माहूर तालुक्यातील मौजे ईवळेश्लर येथील नंदकुमार कांबळे यांनी आज दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी माहूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या लेखी निवेदनातून सदरचा इशारा दिला आहे. दिलेल्या निवेदनानुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रफुल्ल रमेश जाधव यांनी कांबळे यांच्या पत्नी व मुलीला जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र, सदर प्रकरण मागे घेण्यासाठी संबंधित इसमाकडून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप कांबळे यांनी निवेदनातून केला आहे.
दरम्यान, सदर प्रकरण खोटे असल्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकत असून, २१ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, माहूर येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पोस्टद्वारे सांगितले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून तक्रार मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याच्या पार्श्वभुमिवर आपल्या प्रकरणातील पुरावे व संबंधित व्यक्तींचे जबाब बदलण्यासाठीही दबाव आणला जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून आपल्यावर दबाव आणणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे…
“२१ सप्टेंबरला आत्मदहन करणार”
   निवेदनाच्या शेवटी कांबळे यांनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. “मला न्याय मिळाला नाही तर २१ सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी गोरसेना पदाधिकारी व प्रफुल्ल रमेश जाधव यांच्यावर राहील,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर आणि तहसीलदार माहूर यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
“विशेेष म्हणजे सदर प्रकरण हे केवळ तक्रारीपुरतेच मर्यादित नसून अत्यंत गंभीर व स्फोटक स्वरूपाचे बनले आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार यापुर्वीच गुन्हे दाखल झालेले असले तरी दाखल गुन्ह्यात दबाव टाकून त्यास तक्रार मागे घेण्यासाठी टाकत असलेला दबाव, सोशल मीडिया पोस्ट, मोर्चा आणि पुरावे/जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याच्या आरोप निश्चितच गंभीर स्वरूपाची कृती असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे स्वत: तक्रारदाराने प्रकरणाचे गांभिर्य व वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची लेखी मागणी केल्याने आता खरी जबाबदारी आता पोलिस प्रशासनासमोर येवून ठेपली असल्याने प्रकरणातीस सत्य आणि तथ्य पोलीस प्रशासनाने तातडीने तपासून उजागर करण्याची माफक अपेक्षा जनसामान्यांकडुन व्यक्त होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close