क्राइम

माहूरमध्ये रॉयल्टीच्या कारणावरून पोलीस उपनिरिक्षक व वाळू वाहतुकदारांत फिल्मीस्टाईल राडा.. ; चौघांना अटक..

पोलीसांनो... लॉजींगसह इतर अवैध व्यवसायांकडेही लक्ष द्या हो...!! "माहूरात कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था...!!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

 माहूर शहरात रॉयल्टीच्या कारणावरून पोलीस उपनिरिक्षक व वाळू वाहतुकदारांत फिल्मीस्टाईल राडा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून पोलीस उपनिरिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून काल रात्री उशीरा गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली असली तरी यानिमित्ताने माहूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली असून घडलेला प्रकार हा ‘मी’ पणाच्या अहंकाराने घडला असल्याचे सांगण्यात येत आहे…

माहूर पोलीस ठाण्यात मागील एक वर्षांपासून कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक संदीप सुरेशराव अन्नेेेेबोईनईवाड यांनी काल दि. २ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल दि. २ रोजी सकाळी 11:50 वा. च्या सुमारास शहरातील टी-पॉईन्ट येथील जय भोले स्टील दुकानासमोर एक वाळुचा टाटा कंपनीचा टिपर दिसला. त्यावेळी त्यांनी टिपर चालकास रॉयल्टी बाबत विचारणा केल्यानंतर चालकाने आमच्याशी उर्मटपणे रॉयल्टी नाही, म्हणुन अपमानजनक भाषा वापरली. त्यावेळी त्यास सदर टिपरची वाळुची रॉयल्टी नसल्यास कायदेशीर कार्यवाही करु, असे सांगितले असता त्याने टिपर क्र.MH 29 CM 0676 चा मालक राहुल मुसळे, रा. टाकळी ता.माहूर यास फोन करुन बोलावुन घेतले. तद्नंतर टिपर मालक राहुल मुसळे हा आमच्या जवळ येवुन माझे टिपर आहे, कोण अडविले.? तुला माहित नाही काय मी कोण आहे.? ××वण्या, असे म्हणुन गंभीर हुज्जत घालुन वाद घालुन शिवीगाळ करीत होता. तेव्हा मदतीसाठी पो.स्टे. माहूर येथील अन्य कर्मचा-यांना बोलावले. त्यानंतर त्यांना सदरचा टिपर संशयास्पद असुन त्याचे कागदपत्रांची चौकशी करु पोलीस स्टेशनला घेवुन चला, असे सांगितले. टिपर मालकासह चालक व इतर दोघे आमचे अंगावर मारण्यासाठी येवुन आमच्या सोबत धक्का-बुक्की करुन गंभीर वाद घालुन शिवीगाळ करीत तुला जीवंत सोडणार नाही. असे म्हणत शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने अडथळा निर्माण करीत होते. अशी तक्रार फिर्यादी पोलीस उपनिरिक्षक अन्नेबोईनवाड यांनी दि. २ रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिली आहे… यावरून राहुल मुसळे या टिपर मालकासह शक्ती ठाकुर, एकनाथ मानकर तसेच टिपर चालक अमित पावलबुद्धे यांचेविरूद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 132, 121(1), 352, 351(1)(2), 3(5) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली असून यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचे समजते…
तर याउलट दुस-या बाजकडील बचावात्मक युक्तीवाद ऐकल्यास ज्यावेळी टिप्पर उभे होते त्यावेळी टिप्परमध्ये वाळू नव्हतीच..शिवाय होळीचा सण असल्याकारणाने टिप्पर धुवून घेण्यासाठी तेथील वॉटर वॉश स्टेशनवर टिपर धुण्यासाठी उभी केली असल्याचा दावा दुस-या बाजूकडून करण्यात आला आहे… त्यामुळे सदरच्या प्रकरणात काही पुर्वकलुषित भावना तर नाही नां..? असा सवाल उपस्थित होत असून प्रत्यक्षदर्शींच्या मते घडलेले प्रकरण हे केवळ “मी” पणा व आडमुठी मुळे घडले असल्याचे सांगण्यात येत आहे… 
विशेष म्हणजे उभ्या असलेल्या टिप्परला रॉयल्टी विचारून पोलीसांनी आपले कर्तव्य बजावताना ‘भिष्मपराक्रम’ केला हे कुणीही नाकारू शकत नाही.. परंतू, संपुर्ण तालुक्यात मुबलक प्रमाणात मिळणारा गुटखा, माहुर पोलीसांच्या नाकावर टिच्चून शहरात गल्लोगल्ली सुरू असलेले मटक्याचे काऊंटर, अगदी दिमाखात सुरू असलेली चिडी-फकडी, किरकोळ आणि अपवादात्मक केलेली कार्यवाही वगळता गावठी दारू व देशी दारूचा महापूर..! याबाबतचे तर सोडाच..!! परंतू, देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर शहरातील बहुतांश लॉजींग नेमक्या कोणत्या ‘ऑक्सीजन’ वर सुरू आहेत..? त्यात कोणकोणते गैरप्रकार चालतात.? याची कधी माहूर पोलीसांनी कधी खातरजमा किंवा विचारपूस केली का..? किती लॉजींगमध्ये असे प्रकार घडतात याचा संपुर्ण बायोडाटा पोलीस प्रशासनाकडे असूनही कधी एखाद्यावेळी लॉजींग काऊंटर वर पोलीसांनी उतरलेल्या पॅसेंजरबाबत विचारणा केली आहे का..? हा प्रश्न माहूरकरांना भेडसावत असून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांनी आज केलेल्या कार्यवाहीप्रमाणेच शहरात सुरू असलेल्या इतर अवैध बाबींकडेही लक्ष देवून शहरातील कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुधारावी… अन्यथा माहूर पोलीसांवर पडलेला “ना-कर्तेपणाचा” डाग कधीही पुसला जाणार नाही..असे सुचक वक्तव्य शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे…. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close