
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहुर, प्रतिनिधी
समाजमाध्यमांवरून नाभिक समाजाबद्दल अपमानास्पद व द्वेशपुर्वक वक्तव्य केल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ माहूरच्या वतीने माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे..

काल दि. १५ जानेवारी रोजी पोलीस ठाणे माहूर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा माहूर च्या वतीने दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, त्रिशूल माणिकराव पाटील रा. वायफनी या व्यक्तीने सोशल मीडियावर नाभिक समाजाबद्दल जातीवाचाक, अपमानास्पद व द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याबाबतची तक्रार केली आहे.. त्या तक्रारीत नमूद केल्यानुसार त्रिशूल माणिकराव पाटील राहणार वायफनी हा व्यक्ती वारंवार सोशल मिडियावरील instagram वर फॉलोवर्स वाढवण्याच्या आशेपोटी राजकीय तथा सामाजिक लोकांना सर्रास कमरेखालील अश्लील भाषेचा वापर करत असल्याचे सांगून याच नादात सदर इसमाने दिनांक 15 जाने. 2026 ला सकाळी 10:00 वाजता नांदेड न्यूज लाईव्ह च्या पोस्ट बॉलवर नाभिक समाजाला उद्देशून.. “वारकाच्या उकंड्यावर केसच, व त्याच्या घरी दोन टाईमच पीठ नाही….” अशा भाषेचा वापर करून स्वतःला राजे महाराजे समजून बारा बलुतेदार समाजातील नाभिक समाजाला हिन भाषेचा वापर करून आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे समस्त समाजाच्या दुखावल्या असून जातीवाचक, अपमानास्पद, चेष्टेखोर व द्वेष निर्माण करणारी बेताल वक्तव्य करणा-या ‘त्या’ इसमावर तरी मेहरबान अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी लेखी तक्रारीद्वारे मागणी केली आहे…
दिलेल्या तक्रारीसोबत सोशल मिडियावरील संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉट व पुराव्यांंसोबतच नाभिक महामंडळाच्या पदाधिकारी सौ. सुरेखा बालाजी तळणकर यांच्यासह सुरेश गोविंदराव शिंदे, राजाराम पस्पुलवार, बाबारावजी चिल्लेकर, प्रदिप शेरकुरवार, जगदिश वडसकर, विनोद लिंगणवार, आकाश शिंदे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत….





