Uncategorizedईतर
रॉयल्टीच्या कारणावरून घडलेल्या ‘त्या’ प्रकरणाला खळबळजनक वळण ; तक्रार थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात..
"वादग्रस्त पोलीस उपनिरिक्षकाची तातडीने नियंत्रण कक्षात रवानगी...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर शहरातील बहुचर्चीत रॉयल्टीच्या कारणावरून घडलेल्या ‘त्या’ प्रकरणाला खळबळजनक वळण प्राप्त झाले असून केवळ सुडबुद्धीने गुन्हा दाखल करून नाहक त्रास देत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्याने ‘त्या’ वादग्रस्त पोलीस उपनिरिक्षकास माहूर पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करून तातडीने नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश पोलीस अधिक्षक कार्यालयातून निर्गमित करण्यात आले आहेत…
टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक राजू मुसळे यांनी दि. ५ मार्च रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री नांदेड, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरिक्षक परिक्षेत्र नांदेड तसेच पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेल्या लेखी तक्रारीत माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरिक्षक संदीप अन्येबोईनवाड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत… तथापि, विनायक मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माहूर येथील टि पॉईट परिसरात दि. २ मार्च रोजी घडलेल्या बहुचर्चीत प्रकरणात टिपर क्र. एम. एच-२९ सी. एम. ०६७६ क्रमांकाचा टिपर दुरुस्तीसाठी माहूर येथील टी-पॉईंट परिसरात आणण्यात आला होता. त्यावेळी वाहन कोणत्याही गैरप्रकारात गुंतलेले नसताना पोलीसांनी विनाकारण कारवाई करत वाहनाबाबत चुकीची माहिती नोंदवली असा आरोप त्यांच्या तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन द्वेषापोटी भारतीय दंड संहितेच्या कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(१)(२), ३५ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यासंबंधी माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशन माहूर येथे गेलो असता पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांनी मारहाण करत मानहानी केल्याचा दावा त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. परिणामी या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी याबरोबरच य स्वतःला व कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी केली आहे..
तर पोलीस उपनिरीक्षक संदीप सुरेशराव अन्येबोईनवाड यांनी वैयक्तिक द्वेषातून विनायक मुसळे यांच्या भावावर खोटा गुन्हा दाखल करून मानसिक छळ केला. त्यात त्यांचा चुलत बंधू यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून बांधकामाशी संबंधित वस्तूंची विक्री हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ज्याची जीएसटी नोंदणी असल्याचा उल्लेख सुद्धा आपल्या तक्रारीत केला आहे.. त्यामुळे पोलीस उपनिरिक्षक संदीप अन्येबोईनवाड यांच्याविरूद्ध केलेल्या या तक्रारीमुळे माहूर परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणात शासन व प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे..
“विशेष म्हणजे मुसळे यांची तक्रार प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचल्यामुळे व वरच्या पातळीवरून हालचाली सुरू झाल्यामुळे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेले आदेश जा क्र. 41/वाचक/पो.नि. संलग्न/558/2026 नांदेड दि. ७ मार्च २०२६ नुसार श्री. संदीप अन्येबोईनवाड पोलीस उपनिरिक्षक पोलीस स्टेशन माहूर यांना पोलीस स्टेशन माहूर येथून पोलीस नियंत्रण कक्ष नांंदेड येथे संलग्न करण्यात येत आहे. पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन माहूर यांनी पो.उप नि. संदीप अन्येबोईनवाड यांना तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे हजर होणेकामी कार्यमुक्त करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे….





