ईतर

किनवट-माहूर तालुक्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची ऐशी-तैशी…!

"सारखणी नजीक कसायाकडे नेत असलेले पिकअप वाहन पकडले..; दोन गायी सोडून चालक वाहनासह फरार..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू असतानाही किनवट-माहूर तालुक्यात मात्र गोवंशाच्या संशयास्पद वाहतुकीला लगाम लागत नसल्याचे चित्र असून सारखणी नजीकच्या पेट्रोलपंपासमोरील छुप्या मार्गाने कसायाकडे नेत असल्याचा संशय असलेले दोन गोवंश पिकअप वाहनातून आढळून आल्याने वाहन पकडण्यात आल्यानंतर कारवाईची चाहूल लागताच चालकाने दोन गायी तेथेच सोडून वाहनासह धूम ठोकल्याची घटना मागील दोन दिवसांपूर्वी सारखणी नजीक घडल्याचे समोर आले आहे.

किनवट तालुक्यातील सारखणी येथून मिळालेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील एका ठिकाणावरून खरेदी केलेल्या दोन गायी पिकअप वाहनातून दोन दिवसापुर्वी भल्या पहाटे सारखणी येथील पेट्रोलपंपासमोरील सलाईगुडा या छुप्या मार्गाने पडदे लावून नेत असल्याचे सलाईगुडा येथील काही नागरीकांच्या लक्षात आले. त्यावेळी पिकअप वाहनातून दोन गायी संशयास्पदरीत्या नेल्या जात असल्याची खात्री पटल्यानंतर संबंधितांनी वाहनाचा पाठलाग करून ते पकडले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गायी आढळून आल्या. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान साधत गायी तेथेच सोडून वाहन घेऊन पळ काढल्याचे सांगण्यात येत असून सदरील वाहन माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील एक चालक चालवित असल्याचे सांगण्यात येत आहे..
या घटनेमुळे गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत असून वाहन पकडले जाते, गोवंश आढळतो ; मात्र चालक वाहनासह पसार होतो, ही बाब प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे असून गोवंश तस्करांची वाहतुकीची कार्यपद्धती अचूक हेरून गोवंशाची वाहतूक नेमकी कुठून कुठे केली जात होती..? वाहनाचा मालक कोण..? चालक कोण..? या वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का..? तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे का..?, याचा तपास होणे आवश्यक आहे.. 
“विशेष म्हणजे गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असताना किनवट माहूर या दोन्ही तालुक्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामागील कारणे शोधण्याची गरज असून विशेषतः सीमावर्ती भागात होणाऱ्या गोवंश वाहतुकीवर पोलिस व संबंधित विभागांनी अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तथापि, या घटनेत दोन गायींची सुटका झाली असली, तरी वाहनासह फरार झालेल्या चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर तसेच या वाहतुकीशी संबंधित अन्य व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले असून गोवंश हत्याबंदीचा कायदा केवळ कागदावर न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close