Uncategorizedसामाजिक

माहूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त थोर महिलांना अभिवादन….

"सुप्रसिद्ध दत्तकृपा टी स्टॉल येथे महिला दिन साजरा..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

माहूर, प्रतिनिधी

 माहूर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत तहसील परिसरातील प्रसिद्ध दत्तकृपा टी स्टॉल येथे सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांच्या पुढाकारातून थोर महिलांना अभिनादन करण्यात आले…

 

आज दि. ८ मार्च रोजी सनदी अधिकारी तथा समाजसेवेचा वसा घेतलेले एक निर्भेळ व्यक्ती म्हणून किनवट माहूर तालुक्यात नावारूपास आलेले प्रशांत भाऊ राठोड यांच्या पुढाकारातून उभारलेल्या श्री. दत्तकृपा टी स्टॉल येथे आज हा जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पुर्वी जगभरासह भारतभुमीत होवून गेलेल्या थोर महिला तसेच स्वर्गीय पिपळीबाई पूरसिंग राठोड यांना अभिवादन करून अभिवादन करण्यात आले.

 

 

 दरम्यान श्री दत्तकृपा स्टॉलचे संचालक विजय भाऊ कांबळे यांनी पुढाकार घेऊन महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला पत्रकार सौ. पद्माताई गिऱ्हे यांच्या हस्ते थोर महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी वंदना राठोड, शिलाताई कांबळे, सरस्वतीबाई गरुडे, प्रेमिलाताई गरुडे, चैताली राठोड, आरती मोहिते, अनुसया हजारे, मंदाबाई गेडाम यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती…

 

 

“विशेष म्हणजे माहूर शहरातील अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या तहसील कार्यालयाचा गेट समोर सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांच्या पुढाकारातून स्व. पिपळीबाई पूरसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या विजय कांबळे यांच्या श्रीदत्त कृपा टी स्टॉल येथे वर्षभर मान्यवरासह थोरा मोठ्यांची जयंती,  पुण्यतिथी, साजरी होत असते तसेच मान्यवरांचे वाढदिवसही साजरी केले जातात. त्यानिमित्त जगभरातील थोर कर्तबगार महिलांच्या सन्मानार्थ प्रशांत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close