नोकरी संदर्भईतर

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून सिंदखेड पोलीस ठाण्याच्या कामकाजाची वार्षिक तपासणी….

"आजी-माजी पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून सिंदखेड पोलीस ठाण्याच्या कामकाजाची वार्षिक तपासणी करण्यात आली असून यादरम्यान आजी-माजी पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला…
 नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी वार्षिक तपासणीच्या निमित्ताने माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यास काल दि. १० रोजी भेट देत पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर पोलीस पाटील संघटनेचे तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, महिला दक्षता समिती, पत्रकार तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले… दरम्यान वार्षिक आढावा तपासणी दरम्यान सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यातील विविध कामांचा आढावा मांडत प्रस्तावना सादर केली. यावेळी उमाप यांच्या हस्ते आजी माजी पोलीस पाटील,व पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. 
 तपासणी दरम्यान पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलीस ठाणे परिसराची सखोल पाहणी करताना क्राईम रेकॉर्ड, गोपनीय नोंदी, मुद्देमाल कक्ष तसेच इतर प्रशासकीय नोंदींची तपासणी केली. यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याची कामगिरी समाधानकारक असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिकांशी संवाद साधत परिसरातील कायदा व सुव्यवस्था, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा केेेली. तर सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने वाई बाजार येथील पोलीस मदत केंद्र येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटनचे, हॉलि्बॉल, क्रिकेट ग्राऊन्ड चे उद्घाटनही डीआयजी शहाजी उमाप यांच्या व पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार हस्ते करण्यात आले…
याप्रसंगी भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर , पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच परिसरातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close