ईतर

तहसिलदारांंच्या आईवर अश्लिल शिवीगाळ होत असलेल्या व्हिडीओ ने माहूरात एकच खळबळ….

"मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणारी व्यक्ती पत्रकार असल्याचा दावा" 

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  माहूर तालुक्यात समाजमाध्यमांवर प्रचंड वारल होत असलेल्या व्हिडीओने एकच खळबळ उडवली असून व्हिडीओचे बारकाईने निरिक्षण व श्रवण केल्यानंतर व्हिडीओतील मद्यधुंद अवस्थेत थेट तहसीलदारांच्या आईवर अश्लिल शिवीगाळ करताना दिसून येत असल्याने यावर नेमकी काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे….

  सोशल मिडीयाच्या वॉट्सअप व इन्साग्राम या प्लॅटफॉर्मवरून मागील दोन दिवसांपासून वायरल होत असलेला व्हिडीओ तहसीलदार महोदयांशी निगडीत असून त्यात शिवीगाळ करणारा मद्यधुंद अवस्थेतील इसम हा स्वत:ला ‘पत्रकार’ म्हणवून घेत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे… दरम्यान आमच्या वृत्तवाहिनीने याबाबतची सत्यता पडताळून पाहिली असता सदरील मद्यधुंद अवस्थेतील इसम हा तहसीलदार यांच्या आईला शिवीगाळ करीत असल्याचे दिसून येत असून तो नेमक्या कोणत्या तहसीलदाराच्या आईला शिवीगाळ करीत आहे.. याबाबतचा सदर व्हिडीओत अर्थबोध होत नसल्याने नेमकं बिनसलं कुठे..? आणि कुणासोबत हे देखील स्पष्ट होत नसल्याने तसेच याप्रकरणी कुठेही तक्रार दाखल न झाल्याने प्रकरणात नेमकी कार्यवाही कोण करणार..? कार्यवाही होणार की नाही..? का सर्वकाही समजून देखील ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ हे सुत्र अंगिकारून प्रकरण शांत होईल..? याबाबत संपुर्ण तालुक्यात विविध स्वरूपाच्या रंजक चर्चांना उधान आले आहे…
विशेष म्हणजे माहूर शहरात रात्रीच्या वेळी भर रस्त्यावर मद्धधुंद अवस्थेत उच्चपदस्य सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या आई वर अश्लील भाषेत शिवीगाळ करत असलेला इसम स्वतः ला पत्रकार म्हणवून घेत असल्याचे सांगण्यात येत असून स्वयंघोषित राष्ट्रीय स्तरावरच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या गळ्यातला ‘पारसमणी’ असल्याचे बोलले जात आहे.. विशेषत: माहूर तालुक्यात पत्रकारीतेच्या नावाखाली निर्माण झालेल्या अनेक बोगस पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या पत्रकार संघटनेत नुकतीच काही दिवसांपुर्वी ‘अथांग बुद्धीमत्तेच्या या महाशयांची भरती करण्यात आली असल्याचेही विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.. एवढेच नव्हे तर पत्रकारीतेच्या नावाखाली स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणा-यांंची लोकसंख्या देखील माहूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात वाढली आहे…..
   … एकंदरीतच
“संघटना हजार झाल्या, पत्रकारही वाढले..!
नावं लिहीण्याची अक्कल नसावी ज्यांना,
असेही पत्रकार झाले…!!
सच्चा पत्रकारीतेला बदनाम करण्याचा जणू ‘चंग’ बांधिला, दिवसा हप्तेखोरी अन् रात्रीला बार आपुले..!!”
…. याची तंतोतंत प्रचिती येत असून पत्रकारांच्या नावाने भर रस्त्यावर ‘उभा धिंगाणा’ घालणा-या या मद्यधुंद व स्वयंघोषित “यु – ट्युब” पत्रकाराच्या कृतीवर तालुक्यातील जाणकार व लेखणीधारक पत्रकारांकडून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे… 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close