ईतर
घरकुलाच्या थकीत बिलासाठी माहूर नगर पंचायतीला लाभार्थ्यांचा घेराव…!
'माजी उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह शेकडो महिलांचा माहूर न.पं. विरोधात एल्गार.!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर न.पं. च्या बेनामी कारनाम्यातून पुढे आलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत बिलासाठी माहूर नगर पंचायतीला दि. १६ जाने. रोजी काँग्रेसचे आनंद पाटील तुपदाळे व माजी उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह शेकडो महिलांचा माहूर न.पं. विरोधात एल्गार पुकारून न.पं. ला घेराव घालताना योजनेतील थकीत रकमेबाबत विचारणा करत प्रशासनाला धारेवर धरल्याने घरकुल थकीत रकमेचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार हे आता निश्चित झाले आहे…

दि. १६ जानेवारी रोजी माहूर नगर पंचायतीच्या पडद्यामागील अनेक काळ्या कारणाम्यांपैकीच एक असलेला घरकुल थकीत रकमेचा प्रश्न नव्याने उपस्थित करताना माहूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे तसेच माजी उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजनेतील शेकडो महिला व पुरूष लाभार्थ्यांनी माहूर नगरपंचायत कार्यालयास घेराव घालताना लाभार्थ्यांच्यां थकीत रकमेबाबत विचारणा केली.. दरम्यान माहूर नगरपंचायतचे संदीप गझलवाड तसेच नगरपंचायत चे अभियंता विशाल ढोरे यांच्याशी शहरातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत माहूर शहरातील पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या थकीत रक्कमेसंदर्भात जाब विचारताना न.पं. प्रशासनाला अक्षरश: धारेवर धरले… तर शहरातील आयटीआय परिसरात शहरातील बेघरांसाठी ‘म्हाडा’ अंतर्गत आरक्षण पडल्याने यासंदर्भात माहूर न.पं. ने शासनाकडे तातडीने निधीची मागणी करून बेघरासाठी म्हाडाच्या इमारतीचे काम तातडीने सुरू करावे अशीही मागणी करण्यात आली.. यावेळी युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष सचिन बेहेरे यांच्यासह युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सलमान काजी, काँग्रेस नेते अंबादास मुकटे, गोपाळ चव्हाण, शंकर भालेराव, काँग्रेस नेते शेख सादिक, काँग्रेस नेते शरीफ शेख, मनोज जाधव, सैय्यय मन्नान, सुदाम पवार यांच्यासह माहूर शहरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

“विशेष म्हणजे सन २०१७ पासून शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील बिले थकीत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल पंधराशे ते सतराशे असून लाभार्थ्यांच्या एकूण रकमेपैकी प्रत्येकी किमान 20 ते 70 टक्के रक्कम लाभार्थ्यांना मिळणे बाकी आहे. या रकमेचा आकडा पाहील्यास माहूर नं.पं. कडून तब्बल पाच ते सात कोटी रूपये घरकूल लाभार्थांना येणे बाकी आहे. याबाबत अनेकवेळा मोर्चे, उपोषणे व आंदोलने करण्यात आली. परंतू लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम मिळू शकली नाही. यामागचे नेमके गौडबंगाल कोणते..? यासाठी माजी उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे तसेच शहरातील घरकूल लाभार्थ्यांनी देखील माहूर नगर पंचायत विरोधात एल्गार पुकारला असून 2017 पासून ते आजपर्यंत घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम कुठे दडली..? ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात आजवर जमा का केली गेली नाही..? याबाबतचा संपुर्ण छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही तुपदाळे यांनी सांगितले आहे…





