सामाजिक

पडसा येथील ‘त्या’ स्वयंघोषित लोकनेत्याच्या अतिआत्मविश्वासाला न्यायालयाचा दणका…! न्यायालयाला गृहीत धरून रस्ता बंद करण्यासाठी केलेल्या बांधकामावर ‘तोडा-तोडी’ ची टांगती तलवार…?

"वादीच्या विरोधात गेलेला 'तो' आदेश रद्द करून प्रकरणाचा निकाल नव्याने देण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

  बहुचर्चित पडसा येथील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणाने रंजक वळण घेतले असून ‘त्या’ स्वयंघोषित पुढा-याच्या मानसिकतेला मोठा धक्का देत मुख्य पैलूंचा विचार न करता वादीच्या विरोधात वरिष्ठ श्रेणी न्यायालयाने दिलेला ‘तो’ निर्णय रद्द ठरवून ‘त्याच’ प्रकरणाचा नव्याने निकाल देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले असल्याने केवळ ‘मोठेपणा’ व ‘मी’ पणाच्या नादात न्यायालयीन प्रकरणाला नजरेआड करून खिशातल्या पैशांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामावर ‘तोडा-तोडी’ ची टांगती तलवार असल्याने संपुर्ण तालुक्यात या प्रकरणाची चवीने चर्चा होवून ‘त्या’ स्वयंघोषित लोकनेत्याची अक्षरश: ‘गोची’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे… 

     माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील वादी वसंता नागोराव भगत यांनी केलेल्या कथनानुसार त्यांचे घर पडसा या गावचे सन 1962-63 मध्ये पुनर्वसन झाले असून ते राहत असलेली जागा त्यांचे वडील नागोराव भगत यांना शासनाने दिली होती. सदर प्लॉटच्या पुर्वेस सार्वजनिक खुला चौक असून त्याच चौकात सार्वजनिक विहीर तसेच पाण्याची टाकी सुद्धा अस्तित्वात आहे.. तर दुसरीकडे त्यांच्या घरासमोरील खुला चौक ताब्यात घेण्याच्या उद्देशाने तेथील बोगस विवाह मेळाव्याचा जनक व स्वयंघोषित नेता म्हणून फुशारक्या मारणा-या एका गाव पुढा-याला ती बाब खटकली व त्यांनी त्याचे वजन वापरून चक्क घराच्या पायरीजवळूनच संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास भाग पाडले होते.. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर त्यांच्या घरासमोरून येणे जाणे साठी असलेला रस्तादेखील बंद करण्यासाठी काही समाजकंटकांना हाताशी धरून शासकीय निधीचा गैरवापर करताना 200×200 फुट लांबी-रूंदीचा संपुर्ण परिसर मोकळा असताना जाणिवपुर्वक समाजमंदीराचे बांधकाम भगत यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळच घेण्यास ग्रामपंचायतीला भाग पाडले.. यावेळी कायद्याच्या कोणत्याही प्रकारच्या नियम व अटींचे पालन न करता वसंता भगत यांना त्रास व्हावा केवळ हाच हेतू होता….तर शेतकी भानगडीत न्यायव्यवस्थेने भगत यांच्या बाजून निकाल दिल्यानंतर चिडलेेेेेल्या ‘त्या’ लुचाट पुढा-याने गावातील आपल्या मर्जीतील काही लोकांना हाताशी धरून वसंता भगत यांच्या घराचा रस्ता बंद करण्याचे कटकारस्थान केले होते.. त्याविरोधात भगत यांनी वरीष्ठ श्रेणी नांदेड न्यायालयात दिवाणी दावा क्र. आर.सी.एस. 289/2024 अन्वये दावा दाखल करून न्यायालयाचा मनाई हूकूम मिळविला होता.. त्यात न्यायव्यवस्थेने भगत यांच्या बाजूनेे मनाई हूकूम पारीत केल्यानंतर दि. २४ जुलै रोजी चिडून गावातील ‘त्या’ स्वयंघोषित पुढा-याने गावातील काही महिला व पुरूषांना हाताशी धरून न्यायालयाचा स्थगिती आदेश न जुमानता बळजबरीने वसंता भगत यांच्या घराबाहेर पडण्याच्या मार्गात भिंतीचे बांधकाम करून न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केली होती. तर त्याही नंतर त्याच ठिकाणी शासकीय निदीचा गैरवापर करताना समाजमंदीराचे जाणिवपुर्वक बांधकाम केले होते. त्यासंदर्भात याच न्यायालयात अवमान याचिका क्र. 1297/2024 अन्वये पडसा येथील तब्बल 57 जणांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका असलेले प्रकरण सुरू आहे. हे विशेष…! असे असताना दि. २४ जुलै रोजी वादीचा घराबाहेर पडण्याचा बंद करण्यात आलेला रस्ता खुला करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश नांदेड न्यायालयाने माहूर तहसिलदारांना दि. २२ ऑगस्ट रोजी दिले होते. सोबतच घटना स्थळावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सिंदखेड पोलीसांनाही आदेशित करण्यात आले होते.. परंतू त्यावेळी तहसीलदार माहूर यांनी नेमलेल्या तलाठी व मंडळ अधिका-यांनी वादीचा रस्ता मोकळा करून देण्याऐवजी प्रतिवादींच्या मनमर्जीप्रमाणे पंचनामा करण्याचा घाट घालून तेथून पलायन केले होते… दरम्यान पडसा येथील ‘त्या’  प्रकरणात रस्ता खुला करून पुर्ववत करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही रस्ता मोकळा करण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे भगत यांनी न्यायालयात अत्यावश्यक आदेश प्राप्त करण्यासाठी निशानी क्र. ७२ नुसार अर्ज दाखल केला. त्यावेळी वादीची बाजू भक्कम स्वरूपाची असल्याने मुख्य सुनावणीच्या एक दिवस आगोदर वादीच्या वकीलाची कागदपत्राची चक्क फाईलच प्रतिवादींनी चोरून नेली होती. त्यासंदर्भात वदीराबाद पोलीस स्टेशन मध्ये तक्रारअर्ज देखील दाखल आहे… तथापि, ऐन मुख्य सुनावनीच्या वेळी अपेक्षीत कागदपत्रे सादर करता आले नसल्याने त्यावेळी निशानी क्र. ७२ वरील आदेश वादीच्या विरूद्ध गेला होता… 
दरम्यान वरीष्ठ न्यायालयाने दिलेल्या निशानी क्र. 72 च्या आदेशावर उद्विग्न होवून भगत यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे किरकोळ दिवानी अपील क्र. ६५/२०२५ नुसार अपील दाखल केेेले. यात वादीचे वकील राजेंद्र लोणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडताना प्रतिवादीच्या वकीलांना अक्षरश: जेरीस आणून सोडले होते. परिणामी वादीची बाजू भक्कम दिसून आल्याने वादीचे म्हणणे जिल्हा न्यायालयाने मान्य करताना वादीच्या विरोधात असलेला निशानी क्र. ७२ चा ‘तो’ आदेश रद्द केला. तर अर्जाच्या सुनावणीच्या कागदपत्रे चोरीला गेल्याने योग्य ती काळजी घेऊनही वादीला प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे सादर करता आली नसल्याने अर्जाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सदर पुरावे महत्त्वाचे आहेत. यासाठी वादीला अतिरिक्त पुरावे सादर करण्याची संधी देणे न्याय्य ठरेल असे स्पष्टिकरण देताना तो दावा दिवाणी न्यायालयात परत पाठवणे आवश्यक असल्याचा निर्वाळा देताना दोन्ही पक्षांमधील वाद पूर्णपणे सोडवण्यासाठी वादीला अतिरिक्त पुरावे सादर करण्याची संधी देवून दि. ९ फेब्रुुवारी २०२६ रोजी न्यायालयासमोर दोन्ही पक्षकारांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.. सोबतच अत्यावश्यक आदेशाच्या निशानी क्र. ७२ वरील निर्णय पुन्हा घेण्याचे आदेशित केले आहे… या प्रकरणात वादीच्या बाजूने अँड. आर. एम. लोणे यांनी तर प्रतिवादीच्या बाजूने अँड चौदंते यांनी बाजू मांडली…. 
“विशेष म्हणजे वादीच्या वकीलाची फाईल चोरण्याचे लुचाट कार्य करणा-या ‘त्या’ ‘स्रिलंपट’ पांढरपेशा पुढा-याने वंसता भगत यांच्या वकीलाची चक्क फाईलच चोरून त्यावेळी वादीच्या ‘ताटात’ अक्षरश: ‘माती’ टाकल्याची परिस्थिती निर्माण केली होती. एवढेच नव्हे तर नियमांना डावलून केलेल्या समाजमंदीराची केवळ 20 टक्के रक्कम म्हणजेच केवळ 4 लाख रूपये एवढेच प्राप्त झाले असताना शासनाकडुन येणा-या उर्वरीत 16 लक्ष रूपयाची वाट न पाहता खिशातल्या पैशाने समाजमंदीराचे काम पुर्ण केले आहे… अशात दि. २३ जाने. रोजी दिलेल्या निर्णयाने प्रकरणाचे स्पष्ट रूप पुढे आले असून प्रकरण नेमके कोणत्या बाजूने वळण घेणार आहे त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे ‘त्या’ स्वयंघोषित नेत्याचे व त्याच्या ‘बिच्छू’ गँग चे धाबे दणाणले असून वास्तविक व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे येत्या काळात वादीच्या हक्कात न्यायनिर्णय झाल्यास केवळ वैय्यक्तिक भांडणाचा वचपा काढण्यासाठी शासन निधीचा गैरवापर करताना वादीचा रस्ता बंद करण्यासाठी केलेल्या गैरकायदेशीर कृतीस मोठा झटका लागणार आहे. एकंदरीतच ‘त्या’ स्वयंघोषित पुढा-याचा लवकरच न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्याचा गोरखधंदा बंद होणार असल्याचा विश्वास पडसा गावातील ‘बौद्ध’ समाजाने वाळीत टाकलेल्या वादी वसंता भगत यांनी व्यक्त केला असून केवळ दंडेलशाहीने घराचा रस्ता बंद करण्यासाठी केलेल्या समाजमंदीराच्या बांधकामावर आता ‘पाडापाडी’ ची टांगती तलवार असल्याने  ‘त्या’ स्वयंघोषित नेत्यास त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा ठाम निर्धार वादी वसंता भगत यांनी केला आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close