सामाजिक
माहूर शहरात ‘भिमजयंती’ च्या नावाने वर्गणी करून पोट भरणारे ‘भिकमागे’ सक्रीय..!! विविध कार्यालयाकडून अन्नदानाच्या नावाखाली वर्गणी..?
"माहूर शहरात बनावट पावत्यांच्या आधारे वर्गणी गोळा करणारा एक 'भामटा पत्रकार' आढळला.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
‘भिमजयंती’ येताच शहरात जयंतीच्या नावाने वर्गणी करून पोट भरणारे दलाल सक्रीय झाले असून शहरातील विविध कार्यालयाकडून तसेच नामांकित डॉक्टरांंकडून अन्नदानाच्या नावाखाली वर्गणी गोळा करत असताना शहरात नांदेड येथील एक भामटा ‘फेक पत्रकार’ बनावट पावत्यांच्या आधारे अन्नदानाच्या नावाखाली वर्गणी गोळा करीत असल्याने जयंतीच्या नावाने पुन्हा एकदा संधीसाधू ‘वर्गणीकार’ मंडळी आपली रिकामी झोळी भरून घेण्यासाठी रस्त्यावर आल्याचे दिसून येत आहे..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे तळा गाळातील शोषित-पिडीत घटकांच्या उन्नत्तीचा मार्ग खुला करून त्यांना ख-या अर्थाने स्वाभिमानाने जिवन जगण्याची दिशा देणा-या महामानवाचा जयंतीसोहळ्याचा एक आगळा वेगळा सण..! त्यांची जयंती केवळ 14 एप्रिल याच दिवशी नव्हे तर उत्सव संपुर्ण महिनाभर साजरी केली जाते. परंतू, याच संधीचा फायदा उठवत काल दि. २३ मार्च रोजी माहूर शहरातील विविध ठिकाणी नांदेड येथील एक स्वयंघोषित फेक पत्रकार “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती च्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर भव्य अन्नदान वाटप..” या शिर्षकाखाली बनावट पावतीच्या आधारे वर्गणी गोळा करताना आढळला.
दरम्यान चालू वर्षात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती असताना ‘तो’ वर्गणी गोळा करणारा इसम चक्क मागील वर्षाच्या म्हणजेच 134 व्या जयंती उत्सवाच्या पावत्या घेवून संपुर्ण जिल्हाभर वर्गणी गोळा करीत भटकत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरही अतिरेक म्हणजे तो नेमका कोणत्या ठिकाणी व कोणत्या गावी हे अन्नदान करणार आहे..? याची कोणत्याही प्रकारची नोंद पावतीवर नसून केवळ पैसे गोळा करण्यासाठीच हा गोरखधंदा करीत असल्याचे त्याच्या एकंदरीत कृतीवरून दिसून आले आहे… तर याकामी तो एकटाच नसून शहरातील किंवा शहराबाहेरील काही रिकामचोट मंडळी “पी..24 तास” या माध्यमासाठी त्याच्या सोबत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्गणीच्या नावाखाली पैसे गोळा करणा-या भिकारचोटांनी आपली दुकानदारी सुरू केली असून अशा प्रकारचे ‘वर्गणीकार’ समोर आल्यास अशा लोकांवर विश्वास ठेवू नये. एवेेच नव्हे तर त्यांची संपुर्ण माहीती, फोटो, ठिकाण याबाबतची माहीती घेवून सरळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंंवा तातडीने स्थानिक आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी असे आवाहन आंबेडकरी समाजाकडून करण्यात आले आहे…

विशेष म्हणजे माहूर येथील एका प्रतिष्ठीत वैद्यकीय व्यवसाय करणा-या डॉ. जगताप यांच्या हॉस्पिटलमध्ये वर्गणी गोळा करण्यासाठी गेल्यानंतर या इसमाने स्वत: पत्रकार असल्याचे सांगितले असून ‘इंप्रेशन’ मारण्यासाठी स्वत:चे पत्रकार असल्याचे बनावट प्रेस आय डी कार्ड देखील दाखवले. त्यावर ‘वसंत राठोड’ असे नाव असून हा वसंत राठोड नामक भामटा नेहेमीच माहूर शहरातील विविध कार्यालयात ‘भिकमांगो’ आंदोलनासाठी चकरा मारत असतो हे तालुक्यातील बहुतांश पत्रकार मंडळींना माहीत आहे. तथापि, बनावट पावत्यांच्या आधारे वर्गणी वसूली करत असताना प्राप्त झालेल्या सिसिटीव्ही फुटेज वरून ‘तो’ हाच असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही त्याच्या 9767979256 या मोबाईल नंबरवर संपर्क करून त्याला जाब विचारण्याचा प्रयत्नही केला. परंतू हा ‘फकाट’ वसूली किंग प्रचंड दारूच्या नशेत असूनही आमच्या बोलण्याचा सूर लक्षात आल्यानंतर सुरूवातीला टाळटाळ करणारी उत्तरे देवून नंतर त्याने बोलण्याचे टाळून मोबाईल बंद केला..सदरचा फकाट हा स्वत:ला नांदेड येथील सांगत असला तरीही मुळचा माहूर तालुक्यातील मांडवा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे..





