ईतर

महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय नवतेस्विनी महोत्सव संपन्न….

"बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शन ; माविम मित्रमंडळाचा सत्कार...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
नांदेड, प्रतिनिधी
   महाराष्ट्र शासन अंगिकृत महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’ च्या 51 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभुमिवर ननतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय नवतेस्विनी महोत्सव संपन्न झाला असून या महोत्सवात बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री व भव्य प्रदर्शनाने नांदेड माविम टिमचे कार्याचे अभिनंदन होत आहे.
 महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) नांदेड, महाराष्ट्र शासन अंगिकृत महिला व बालविकास विभागाच्या अधिनस्त माविमच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अंबिका मंगल कार्यालयात दि. २७ ते २९ मार्च दरम्यान या विलक्षण आणि महिलांच्या सर्वांगीन आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून भरवण्यात आलेल्या या विक्री व प्रदर्शनास जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बचतगट महिलांनी स्वत: उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनास महिला भगीनींचा उदंड प्रतिसाद मिळाला. 
तत्पुर्वी दि. २७ मार्च रोजी पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या हस्ते या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन झाले. तर महोत्सवाच्या दुस-या दिवशी दि. २८ रोजी समाजकल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्यासह प्रा. डॉ. पुरनशेट्टीवार मॅडम (राज्यशास्त्र विभागप्रमुख), प्रा. डॉ. चंद्रकांत गजभारे (समाजशास्त्र विभागप्रमुख, पिपल्स कॉलेज नांदेड) , सुनिल कल्याणकर (सहा. प्रकल्प अधिकारी न.प.भोकर), अंजली नरवाडे, नांदेड मनपाचे सहा. उपायुक्त कदम सर तसेच अनंत खेत्रे (जिल्हा समन्वयक अधिकारी माविम जिल्हा कार्यालय, नांदेड), सौ. शिलाताई संगेवार (लेखाधिकारी माविम नांदेड), चंद्रशेखर हिंगोले (कार्यक्रम अधिकारी), गणेश तोडकर (MIS), कैलाश ऋधोड (उपजिविका सल्लागार माविम नांदेड) यांच्या प्रमुख उपस्थितीत नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत माविम मित्रमंडळाचा घटक म्हणून कार्यरत असलेल्या व महिला सबलीकरणाच्या कार्यात सहभाग  दिल्याबद्दल माविम मित्रमंडळाच्या किनवट विभागातील किशन चंदू शेळके, संभाजी रामदास भिसे, हिमायतनगर येथील सदानंद विठ्ठलराव लिंबेकर, तसेच माहूर विभागातील विजय पंजाबराव खडसे यांच्यासह इतर एक असे दोन कार्यकर्त्यांना  “Gender Sensitive Role Model Award -2026” चे सन्मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले… तर दि. २९ मार्च रोजी या तीन दिवसीय महोत्सवाची सांगता झाली…
  “यावेळी किनवटसह माहूर, हिमायतनगर व इस्लापूर या चारही विभागातील असंख्य बचतगट महिला भगीनींसह प्रगती लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक विशाल श्रोते, राहूल शिंदे, रमा दामोदर, जगन्नाथ रणितवाड, अर्चना मॅडम, रणिता कार्लेवाड, नवनाथ फुले, सिंधू लिंबेकर तसेच भाग्यश्री भगत यांची उपस्थिती होती. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close