नोकरी संदर्भईतर

माहूर तहसील कार्यालयांतर्गत महिला मंडळ अधिका-याची अफलातून कारगीरी..? पदभार मिळाला 19 ला, अन् फेरफार मंजूर केले 17 तारखेलाच… ! व्वा..!!

"पदभार नसतानाही एकाच दिवशी तब्बल 40 फेरफार मंजुर ; महसूल विभागासह जनमानसांत एकच खळबळ ..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  विविध कारणांनी चर्चेत असलेल्या माहूर तहसील कार्यालयांतर्गत आणखी एक प्रकरण समोर आले असून यात मंडळ अधिका-याचा अफलातून कारभार उघड होताना चक्क पदभार नसतानाही मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फेरफारांसह एकाच दिवशी तब्बल 40 फेरफार मंजुर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने महसूल विभागासह जनमानसांत एकच खळबळ उडाली आहे.
  माहूर तालुक्यातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या माहूर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी सुदर्शन नारायण बुरकुले हे दि.16.12.2025 पासून 15 दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यावेळी माहूर महसूल मंडळाचा पदभार दि. 16 ते 19 या वेळेत रिक्त होता. रिक्त असलेला ‘तो’ पदभार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी वाई बाजार महसूल मंडळाच्या मंडळाधिकारी श्रीमती राठोड योगिता नामदेव यांच्याकडे अधिकृतरित्या सोपवण्यात आला. परंतू, वाई बाजार महसूल मंडळातील मंडळ अधिकारी श्रीमती राठोड यांनी माहूर महसूल मंडळाचा अधिकृत पदभार नसतानाही दि. 17 डिसेंबर म्हणजेच अधिकृत पदभार मिळण्याच्या दोन दिवस आगोदर एकाच दिवशी तब्बल ४० फेरफार मंजूर करण्याचा विक्रम केला असल्याची खळबळजनक बाब अधिकृत कागदपत्रावरून समोर आली असून त्यातील काही फेरफार तर निृमबाह्य व इतर अनेक त्रुट्यांत मोडत असल्याने सन 1996 पासून प्रलंबित असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे ही अनाकलनीय बाब सर्वसामान्यांच्या पचनीच पडत नसून यात अनेक गैरप्रकाराच्या कामांसह मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामे केली असल्याचे बोलले जात आहे. तथापि, जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे याप्रकरणी साजीद खान यांनी तक्रार केली असून प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी सुरू असल्याचेही तक्रारकर्ते साजीद खान यांनी सांगितले आहे. तर मंडळाधिकारी श्रीमती राठोड यांना याप्रकरणाबाबतची भ्रमणध्वनीवरून माहीती व प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मिटींगमध्ये असल्याचे कारण देत याबाबत माहिती अथवा प्रतिक्रिया देण्याचे टाळले….
“विशेष म्हणजे वाई बाजार महसूल मंडळातील बंजारा तांडा (बंजारवाडी), वडसा, आसोली येथील फेरफार अनेक महिण्यांपासून प्रलंबित असतानाही ते पुर्ण केले जात नाहीत. अशात माहूर महसूल मंडळ चा पदभार नसतानाही तेथील तब्बल 40 फेरफार हे एकाच दिवशी मंजूर करण्यामागचे नेमके ‘गौडबंगाल’ काय..? त्यातही विशेष बाब म्हणजे काही फेरफार तर सन 1996 पासून प्रलंबित असल्याचे एक पडद्यामागचे ‘गुपित’ नाव न सांगण्याच्या अटीवर बदली होवून इतर ठिकाणी गेलेल्या  एका महसूली कर्मचा-याने सांगितले असून त्यामुळे या प्रकरणात मोठी आर्थीक उलाढाल झाली असल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. परिणामी यामागचे नेमके सत्य उजागर होणे गरजेचे असून प्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय..? हे शोधण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावणे अत्यंत गरजेचे आहे. तथापि, यातील दोषी व लालसेने ग्रस्त कर्मचा-यांना तातडीने बडतर्फ करण्यासंबंधिची पुढील कार्यवाही करावी. अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close