सामाजिक
हरदडा येथे 30 मार्च रोजी तिस-या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…!
"विशेष गौरवरत्न पुरस्कारासह मोफत नेत्र व दंत तपासणीसोबतच बुद्ध भिम गितांच्या सांस्कृतिक संध्येची मेजवाणी..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
उमरखेड/ढाणकी
उमरखेड तालुक्यातील हरदडा येथे 30 मार्च रोजी तिस-या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून विशेष आकर्षणांसह वैचारीक विचारांची मेजवाणी सोबतच अनेक सामाजिकदृष्या उपयुक्त उपक्रमांची नांदी असलेल्या या सामाजिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे..
प्रणिताताई बहुउद्देशीय संस्था हरदडा यांच्याकडून येत्या ३० मार्च २०२६ रोजी होत असलेल्या तिस-या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिमटायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे लाभणार आहे.. सलग तिस-या वर्षी होत असलेल्या धम्म परिषदेेेचे अध्यक्ष श्रीकांत बनसोड तर स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे व युवराज मोहन मोरे हे असणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मा. आ. किशनराव वानखेडे यांच्यासह प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, नामदेवराव ससाणे, उत्तमराव इंगळे या माजी आमदारांसह भाजपाचे मा. जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे…तर धम्म परिषदेतील विशेष आकर्षण म्हणजे आंबेडकरी समाजातील तळागाळातल्या बुद्धीमान व होतकरू विद्यार्थ्यांना प्रशासनाती मोक्याच्या जागेवर बसण्यासाठी तयार करून अक्षरश: आंबेडकरी समाजातील विद्यार्थ्यांमधील बुद्धीचा खजिना शोधून त्यास उजाळी देवून तरूण पिढीला घडविण्याचे मोलाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून करीत असलेले आंबेडकरवादी मिशन केंद्र नांदेडचे प्रमुख मा. दिपक कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके यांच्यासह डॉ. आयुब खाँ आ. पठाण (उमरखेड), श्रीमती सुमित्राबाई संदिपान खरे (से. नि. बालविकास प्रकल्प अधिकारी) तसेच साहेबराव कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे…
तत्पुर्वी, धम्म परिषदेच्या पहिल्या पुष्पात सकाळी ७ वा. धम्मभगिनी आयु. सुजाताताई अशोक दवने यांच्यासह शांताबाई शंकर कांबळे व छाया विनयराव कवडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन पार पडल्यानंतर दुस-या पुष्पात सकाळी ८ वा. भदंत पय्याबोधी थेरो, अध्यक्ष भिक्खू संघ तथा प्रमुख श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा जि. नांदेड यांच्यासह भिक्खूसंघाची धम्मदेसना होणार असून तिस-या पुष्पात सायं. ७ वाजता विविध विॊयातील तज्ञ वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे.. तद्नंतर चौथ्या पुष्पात रात्री ८ वा. गौरव सोहळा समारंभात जयकिशनराव रावळे ता. अध्यक्ष वं.ब.आ. हदगाव यांच्यासह अमोल कदम (युवा उद्योजक तामसा), लक्ष्मण वाठोरे, संविधानप्रेमी हरीदास कदम वायफना तसेच रहिम शेख, रिलस्टार वायफना याच्यासह अनेकांचा गौरव व विशेष गौरवरत्न पुरस्कार समारंभ सोहळा पार पडणार आहे… तर शेवटच्या आणि पाचव्या पुष्पात रात्री ९ वा. सांस्कृतिक संध्येच्या संगितमय प्रवाहात रममाण होण्यासाठी भिमबुद्ध गितांची मेजवाणी घेवून विकास राजा नागपूरकर व संच तसेच त्यांच्या जोडीला बरोबरीच्या ताकदीने गायिका निशा धोंडगे व संच यांच्या बुद्ध-भिम गितांचा दणदणीत सामना होणार आहे….
“विशेष म्हणजे या धम्मपरिषदेत सामाजिक बांधिलकी व सामाजिक आरोग्याचा वसा जोपासताना मोफत नेत्र व दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून नेत्ररोग तज्ञ डॉ. टि.ए.माने तसेच दंतरोग तज्ञ डॉ. लक्ष्मण मोगले यांच्याकडून नेत्र व दंतरोग यावरील आजारांवरील तपासणीची सेवा मिळणार आहे. सोबतच सामाजिक स्वास्थ्यासाठी अनेक विचारवंतांच्या विचारांची शिदोरी येथील धम्मपीठावर सोडली जाणार असल्याने या धम्मपरिषदेस मोठ्या संख्येने समाजबांधवांसह आंबेडकरवादी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजिका प्रणिताताई गौतम कांबळे यांच्यासह संयोजक गौतम कांबळे तसेच कार्यकारी समितीतील डि.एफ. हरदडकर, लक्ष्मण धुळे, संभाजी कांबळे, भारत कांबळे, रविचंद्र दवने, विश्वजीत कवडे, प्रवेश कवडे, संदिप राऊत, हिरामन कांबळे, सचिन कांबळे, सुधाकर राऊत, दिलीप कांबळे, विश्वास कांबळे, जनार्दन तुळसे, किशोर कांबळे तसेच समस्त रमामाता महिला मंडळ हरदडा यांच्या वतीने करण्यात आले आहे…





